घरट्रेंडिंगअरे देवा, या महिलेला लागलंय लग्नाचं व्यसन, बाराव्या पतीच्या शोधात

अरे देवा, या महिलेला लागलंय लग्नाचं व्यसन, बाराव्या पतीच्या शोधात

Subscribe

लग्नाचा क्षण हा आयुष्यातील सर्वात अनोखा क्षण असतो. अनेकांना असे वाटते की, लग्न एकदाच होते, त्यामुळे लग्नाचा तो क्षण अविस्मरणीय बनवण्यासाठी खूप प्रयत्न करत असतात. मात्र एका महिलेला चक्क लग्नाचं व्यसन जडल्याची माहिती समोर आली आहे. ही महिला आत्ता तिच्या १२ व्या पतीच्या शोधात आहे. यासाठी ती आत्ता अनेक लोकांच्या संपर्कात असून काही जणांशी तिचे बोलणेही सुरु आहे.

वास्तविक ही महिला अमेरिकेची रहिवासी आहे. इनसाइडरने दिलेल्या ऑनलाइन रिपोर्टनुसार, मोनेट असे या ५२ वर्षीय महिलेचे नाव आहे. या महिलेने नऊ वेगवेगळ्या पुरुषांशी ११ वेळा लग्न केले आहे. परंतु तरीही ही महिला आता पुन्हा नव्या जोडीदाराच्या शोधात आहे. महिला आता ५२ वर्षांची झाली असली तरी ती अजूनही स्वत: नव्या पतीच्या शोधात आहे. तिला लग्नाचे काही प्रस्तावही अजून येत आहेत.

- Advertisement -

यावर महिलेने सांगितले की, जेव्हा ही महिला लहान होती तेव्हा ती तिच्या भावाच्या मित्रांशी लग्न करण्याची कल्पना करत होती. मोनेटने हायस्कूलचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर लगेचच पहिल्यांदा लग्न केले. त्यानंतर तिने नऊ वेगवेगळ्या पुरुषांशी ११ वेळा लग्न केले. पण यापैकी तिचा एकही विवाह फार काळ टिकू शकला नाही. आश्‍चर्यकारक गोष्ट म्हणजे, तिचे एका पुरुषाशी दोनदा लग्न झाले आहे. सततच्या घटस्फोटावर महिलेने सांगितले की, वारंवार होणाऱ्या लग्नामुळे ती निराश झाली नसून आता तिला लग्नाचे व्यसन जडले आहे.

या महिलेने तिच्या काही लग्नांसंदर्भात महिती देताना सांगितले की, तिच्यासाठी पाचव्या क्रमांकाचा नवरा सर्वोत्कृष्ट होता. तिला सहाव्या नंबरच्या नवऱ्याचा स्वभाव देखील खूप आवडला होता, म्हणून तिने त्याच्यासोबत दोनदा लग्न केले. सध्या ही महिला एका पुरुषाला दोन वर्षांहून अधिक काळ डेट करतेय. आता ती त्याच्याशी लग्न करणार आहे. गंमत म्हणजे या महिलेने या व्यक्तीशी यापूर्वी दोनदा लग्न केले आहे.


नोटीस पीरियडशिवाय नोकरी सोडताय? पगारावर भरावा लागेल जीएसटी


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -