लाईव्ह टीव्ही डिबेटमध्ये बोलण्याची संधी न दिल्याने महिलेने वेडे वाकडे इशारे करत सुरू केला नाच, पाहा Viral Video

ग्रीन कलरचा कुर्ता घातलेल्या महिलेचे म्हणणे कोणीही ऐकून घेत नव्हते. तिलाही आपले मुद्दे मांडायचे होते मात्र तिचा माइक म्यूट करण्यात आला होता. शेवटी महिलेने वैतागून लाइव्ह स्क्रिनवर वेडेवाकडे हातवारे करून नाचायला सुरुवात केली

woman started dancing with crazy gestures in the live TV debate after Not giving chance to speak
लाईव्ह टीव्ही डिबेटमध्ये बोलण्याची संधी न दिल्याने महिल्याने वेडे वाकडे इशारे करत सुरू केला नाच, पाहा Viral Video

न्यूज चॅनेलवर डिबेटमध्ये ( live TV debate ) सुरू असलेला आरोडा ओरडा आपण अनेकदा पाहिला आहे. यात कोण कोणाला कधी काय बोलेल आणि कोणाला कसे गप्प करेल काही सांगता येत नाही. अनेकांना डिबेटमध्ये सहभागी होऊनही बोलण्याची संधी मिळत नाही. असाच एक प्रकार एका टीव्ही चॅनेलच्या डिबेटमध्ये घडला. अँकरने महिलेला बोलण्याची संधीच न दिल्याने तिने वैतागून लाइव्ह टीव्हीत थेट नाचायला सुरुवात केली (woman started dancing with crazy gestures)  आणि हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

एका बंगाली न्यूज चॅनलच्या पॅनल डिस्कशनमधील 12 सेकंदाची क्लिप सध्या व्हायरल होत आहे. डिस्कशनमध्ये एकूण 5 जण सहभागी झाले होते. ज्यात तीन पुरुष आणि दोन महिला होत्या. डिस्कशनमध्ये सर्वच जण मोठ मोठ्याने बोलत होते. यात ग्रीन कलरचा कुर्ता घातलेल्या महिलेचे म्हणणे कोणीही ऐकून घेत नव्हते. तिलाही आपले मुद्दे मांडायचे होते मात्र तिचा माइक म्यूट करण्यात आला होता. शेवटी महिलेने वैतागून लाइव्ह स्क्रिनवर वेडेवाकडे हातवारे करून नाचायला सुरुवात केली आणि भांडत असलेले सर्व उपस्थित थांबले आणि महिलेच्या नाचाकडे बघू लागले. बराच वेळ कोणीही बघायला तयार नसलेल्या महिलेकडेच आता सर्व बघायला लागले.

पाहा व्हिडीओ 

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडीओ 16 जानेवारीचा असून @Elizatweets नावाचा एका युझरने शेअर केला आहे. आतापर्यंत या व्हिडीओला 32 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. महिलेचा नाच पाहून नेटकऱ्यांना देखील हसू आवरले नाही. भांडणे दाखवण्यासाठी असा डिबेट शो रोज दाखवा, अशा प्रकारच्या कमेंट व्हिडीओवर पहायला मिळत आहेत. चॅनेलवरच्या पॅनेल डिस्कशनमध्ये होणाऱ्या भांडणापेक्षा महिलेचा नाच चांगला आहे अशा कमेंट सध्या या व्हिडीओवर येत आहेत.


हेही वाचा – जेली, टूटी फ्रूडी अन् ड्राय फ्रूट्स भरलेला Candy Crush पराठा पाहून नेटकरी म्हणाले…