Monday, July 26, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर ट्रेंडिंग ...आणि ६३०० फूट उंच कड्यावरून झोका घेताना पाळण्याची दोरीच तुटली

…आणि ६३०० फूट उंच कड्यावरून झोका घेताना पाळण्याची दोरीच तुटली

Related Story

- Advertisement -

रशियामध्ये दोन महिला ६३०० फूट उंच कठड्यावरील एका पाळण्यात बसत झोका घेत होत्या. मात्र झोका घेता घेता अचानक पाळण्याचा दोर खंड तुटला आणि दोन्ही महिला उंच कठड्यावरून खाली पडल्या. विशेष म्हणजे एवढ्या उंचावरून खाली पडूनही या महिलांना कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही. सध्या या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्याप्रमाणात व्हायरल होत आहे.

डेली मेलच्या वृत्तानुसार, या दोन महिला रशियन प्रजासत्ताकच्या दागिस्तानमध्ये सुलाक कॅन्यनवर पाळण्यावर झोका घेत होत्या. मात्र अचानक पाळण्याची साखळी पटकन तुटली, त्यावेळी या दोन्ही महिला हवेतचं झुलणाऱ्या पाळण्यावरून खाली पडल्या. एवढ्या उंचावरून दरीत कोसळूनही या महिला किरकोळ जखमी झाल्या आहेत. हे पाहून साऱ्यांनीच आश्चर्य व्यक्त केला आहे.

- Advertisement -


इतक्या उंचीवरून खाली पडून. दोन्ही महिलांना किरकोळ जखमा झाल्या आहेत. मात्र पूर्णपणे ठीक आहेत. मात्र ही घटना पाहणाऱ्यांचा एकचं गोंधळ उडाला. एवढ्या उंचावरून पडल्यामुळे या महिलांचा जागीच मृत्यू झाला असे अनेकांना वाटले. यामुळे भीतीचे वातावरण पसरले होते. मात्र दोन्ही महिला अगदी सुरक्षित होत्या. या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे.

अशा उंच डोंगरांवर कोणतीही सुरक्षा यंत्रणा नसताना अशाप्रकारचे झोका बांधून जीव धोक्यात घालत कितपत योग्य आहे असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. सध्या याविषयी पोलिसांनी तपास सुरु केला आहे.


- Advertisement -

 

- Advertisement -