घरट्रेंडिंगवाचा: गर्लफ्रेंडला डेट करताय वेळीच सावध व्हा!

वाचा: गर्लफ्रेंडला डेट करताय वेळीच सावध व्हा!

Subscribe

कारण मुलींना तुमच्यामध्ये कमी आणि तुमच्याबरोबर डेटवर जाऊन खाण्यामध्ये जास्त इंटरेस्ट असतो

नुकतेच महाराष्ट्रामधील ५० टक्के जास्त पुरुष हे अविवाहित असल्याची माहिती समोर आली होती. कदाचित म्हणूनच आजकाल डेटिंग अॅप्सची लोकप्रियता फार वाढत आहे. शहरातील तरुण मुलांना ‘लिव्ह इन रिलेशनशीप’मध्ये राहायला आवडत असल्यामुळे अविवाहित लोकांच्या संख्येत भर पडली आहे.

हेही वाचा: ‘या’ कारणांमुळे ५३ टक्के पुरुष तर, ४२ टक्के महिला अविवाहित

- Advertisement -

आताच सीएसडीएसने केलेल्या सर्वेक्षणातही शहरी भागातील तरुण पिढी लग्नापेक्षा लिव्ह इन रिलेशनशीपलाच जास्त प्राधान्य देत असल्याची बाब समोर आली आहे. मेट्रो शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात मुले मुली डेटवर जात असल्याचे पाहायला मिळते. त्यामुळे तुम्ही एखाद्या अॅपवरुन किंवा सोशल नेटवर्किंग साईटवरुन भेटलेल्या एखाद्या मुलीला डेट करत असलात तर वेळीच सावध व्हा. कारण मुलींना तुमच्यामध्ये कमी आणि तुमच्याबरोबर डेटवर जाऊन खाण्यामध्ये जास्त इंटरेस्ट असतो, असा दावा अमेरिकेतील एका विद्यापिठाने केलेल्या संशोधनावरून सिद्ध झाले आहे.

असे म्हटले आहे या संशोधनातील अहवालात…

डेटिंग करणाऱ्या चार मुलींपैकी एक ही केवळ खाण्यासाठी एखाद्या मुलाला डेट करत असते असा दावा या संशोधनानंतर समोर आलेल्या निष्कर्ष अहवालात करण्यात आला आहे. अशा मुलींच्या मनात रोमान्स किंवा रिलेशनशिपचा कोणताही विचार नसतो. म्हणजेच, एखाद्या व्यक्तीमध्ये भावनिक दृष्ट्या कोणताही इंटरेस्ट नसताना देखील केवळ फुकटचे खाणे मिळवण्यासाठी मुली एखाद्याला डेट करत असतात. सध्या हा प्रकार चांगलाच ट्रेंडमध्ये असून याला, ‘फूडी कॉल’ असे म्हटले जाते.

- Advertisement -

अझुसा पॅसिफिक विद्यापीठ आणि कॅलिफॉर्निया मर्स्ड विद्यापिठाने केले ऑनलाइन सर्वेक्षण

या सर्वेक्षणामधील २३ ते ३३ टक्के महिलांनी आपण केवळ फुकट खाणे मिळते म्हणून एखाद्याला डेट करत असल्याचे मान्य केले आहे. यो सर्वेक्षणामध्ये २३ ते ३३ टक्के मुलींनी हे मान्य केले आहे की त्या फक्त फुकटचे जेवायला मिळते म्हणून डेटवर जातात. यासाठी महिला पुरुषांच्यासोबत खोटे भावनिक संबंधही प्रस्थापित करतात. या विषयावर ब्रायन यांनी संशोधन केलेला प्रबंध ‘सोशल सायकोलॉजीकल अॅण्ड पर्सनॅलिटी सायन्स’ जनरलमध्ये प्रसिद्ध झाला आहे.

असेही या अहवालातून आले समोर 

या सर्वेक्षणातील पहिल्या टप्प्यात एकूण ८२० महिलांनी सहभाग घेतला होता. काही प्रकरणांमध्ये पुरुषही मोफत खाण्यासाठी खोट्या प्रेमाचा आव आणतात तर, यापैकी ३५७ जणींना हेच प्रश्न विचारण्यात आले तेव्हा त्यापैकी ३३ टक्के महिलांनी होय आम्ही केवळ फुकट जेवणासाठी एखाद्या व्यक्तीला डेट करतो असे सांगत फूडी कॉल्स केल्याचे मान्य केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -