घरट्रेंडिंगWorld Brain Tumour Day: आज जगभरात साजरा केला जातो वर्ल्ड ब्रेन ट्यूमर...

World Brain Tumour Day: आज जगभरात साजरा केला जातो वर्ल्ड ब्रेन ट्यूमर डे, काय आहेत ब्रेन ट्यूमरची लक्षणे?

Subscribe

रेडिएशनच्या संपर्कात असणारे किंवा सतत धुम्रपान करणाऱ्यांमध्ये ब्रेन ट्यूमरचा सर्वाधिक धोका

दरवर्षी जगभरात ८ जूनला वर्ल्ड ब्रेन ट्यूमर डे (World Brain Tumor Day)  साजरा केला जातो. ब्रेन ट्यूमर सारख्या गंभीर आजाराबाबत जनजागृती करणे हा उद्देश हा दिवस साजरा करण्यामागे असतो. ब्रेन ट्यूमरची समस्या गेल्या काही वर्षांपासून दिवसेंदिवस वाढत जात आहे. रेडिएशनच्या संपर्कात असणारे किंवा सतत धुम्रपान करणाऱ्यांमध्ये ब्रेन ट्यूमरचा सर्वाधिक धोका असतो. वर्ल्ड ब्रेन ट्यूमर डेच्या दिवशी ब्रेन ट्यूमरविषयी जनजागृती करणारे कार्यक्रम आयोजित केले जातात किंवा अनेक ठिकाणी रॅली काढल्या जातात. जगात पहिल्यांदा जर्मनमध्ये वर्ल्ड ब्रेन ट्यूमर डेचे आयोजन केले गेले होते. जर्मनी ब्रेन ट्यूमर असोसिएशन ही संस्था ब्रेन ट्यूमर बाबतीत जनजागृती करण्याचे काम करते. आज वर्ल्ड ब्रेन ट्यूमर डेच्या दिवशी ब्रेन ट्यूमर म्हणजे काय? त्याची लक्षणे काय आहेत? जाणून घ्या. (World Brain Tumor Day: What are the symptoms of brain tumor?)

ब्रेन ट्यूमर म्हणजे काय?

मेंदूमध्ये असामान्य पेशी वाढू लागतात ज्याला ब्रेन ट्यूमर असे म्हणतात. मेंदूच्या पेशींमध्ये विलक्षण वाढ होते आणि तिथे एक गाठ तयार होते. ब्रेन ट्यूमरच्या आजाराला हलक्यात घेऊ नये कारण बऱ्याचदा ब्रेन ट्यूमरची गाठ पुढे जाऊन कॅन्सरची गाठ ठरु शकते. त्यामुळे ब्रेन ट्यूमरची लक्षणे माहिती करुन घेणे अत्यंत गरजेचे आहे आणि त्यानंतर त्यावर योग्य उपचार करणेही महत्त्वाचे आहे.

- Advertisement -

ब्रेन ट्यूमरची लक्षणे काय?

  • बऱ्याचदा डोळ्यांना धुरकट दिसणे. एखादी वस्तू पाहण्यासाठी अडथळा येणे.
  • सकाळी उठल्यावर तीव्र डोके दुखी होणे. सतत बेशुद्ध होणे हे देखील ब्रेन ट्यूमरचे लक्षण असू शकते.
  • अचानक घाबरल्यासारखे होणे. उलटी होणे.
  • दररोजच्या कामांत गोंधण उडणे. वागण्या बोलण्यामध्ये बदल जाणवणे.
  • ऐकण्यासाठी अडथळा येणे.

ब्रेन ट्यूमरवर जितक्या लवकर उपचार करता येतील तितके चांगले. ब्रेन ट्यूमरचे उपचार ट्यूमरच्या आकारावरही अवलंबून असतात. ब्रेन ट्यूमरची प्राथमिक लक्षणे दिसताच त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.


हेही वाचा – उपवास स्पेशल रेसिपी: झटपट तयार करा साबुदाण्याचे थालीपीठ

- Advertisement -

 

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -