World Chocolate Day: आज जागतिक चॉकलेट दिवस साजरा करण्यामागचे कारण काय? जाणून घ्या

१५५०मध्ये यूरोपात चॉकलेट बनवण्यास सुरुवात झाली.

World Chocolate Day: What is the reason behind celebrating World Chocolate Day today? Find out
World Chocolate Day: आज जागतिक चॉकलेट दिवस साजरा करण्यामागचे कारण काय? जाणून घ्या

आज जगभरात जागतिक चॉकलेट दिवस साजरा करण्यात येतो. (World Chocolate Day)  खरंतर चॉकलेट लव्हर्ससाठी रोजच चॉकलेट डे असतो. चॉकलेट केवळ चवीलाच चांगले नाही तर आपल्या आरोग्यासाठी देखील उत्तम आहे. चॉकलेट तर आपण रोजच खातो मग आजच्या दिवशी जगभरात चॉकलेट डे साजरा करण्यामागचे कारण काय? जाणून घ्या.

१५५०मध्ये यूरोपात चॉकलेट बनवण्यास सुरुवात झाली. त्यावेळी चॉकलेट हे केवळ दक्षिण, मध्य अमेरिका आणि मॅक्सिकोच्या काही भागांपूर्ती मर्यादित होते. तिथे राहणाऱ्या आणि तिथे जाणाऱ्या लोकांना चॉकलेट्स आवडायला लागले. त्यानंतर १५१९मध्ये एका स्पॅनिश शोधकर्ता हर्नान कोर्टेसने चॉकलेटपासून एक पेय तयार केले आणि ते पेय तो आपल्या सोबत स्पेनमध्ये घेऊन आला. त्या पेयाचा स्वाद वाढवण्यासाठी त्याने त्यात वेनिला,साखर आणि दालचिनी घातली. स्पॅनिश आक्रमणानंतर १६००च्या दशकात हे पेय इंग्लंड आणि फ्रान्समध्ये सर्वाधिक लोकप्रिय झाले. त्यानंतर पुढील काळात जगभरात अनेक लोकांनी चॉकलेटपासून अनेक नवनवीन पदार्थ तयार केले. त्यानंतर जगभरात आजच्या दिवशी चॉकलेट डे म्हणून साजरा करण्यात आला.

एज्टेंक संस्कृतीत चॉकलेट केवळ खाण्यासाठी किंवा त्याचे पेय म्हणून नाही तर चॉकलेट एक चलन म्हणून वापरण्यात येत होते. जगभरात ३० टक्के कोकोचे बीज हे आफ्रिकेत उत्पादित केले जातात. अमॅझोनच्या जंगलात कोकोची उत्पत्ती झाली आहे.

चॉकलेट डे इतर दिवशीही साजरा केला जातो. २२ सप्टेंबरला व्हाइट चॉकलेट डे साजरा केला जातो. तर २८ जुलैला मिल्क चॉकलेट डे तर १६ डिसेंबरला चॉकलेट कवर्ड एनीथिंग डे आणि १० जानेवारी रोजी बिटरस्वीट चॉकलेट डे साजरा केला जातो.


हेही वाचा – पनीर असली आहे की भेसळयुक्त? कसे ओळखाल?