घरट्रेंडिंगअर्जेंटीनात जगातील सर्वात मोठ्या ४ फुटाच्या उंदरांचा सुळसुळाट

अर्जेंटीनात जगातील सर्वात मोठ्या ४ फुटाच्या उंदरांचा सुळसुळाट

Subscribe

अर्जेंटीनाची राजधानी ब्यूनस आयर्समधील नॉरडेल्टाम या शहरात जगातील सर्वात मोठ्या उंदरांनी हौदस घातला आहे. जवळपास ४ फुटाच्या उंदरांमुळे शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे. हे उंदीर शहरात खुलेआमपणे फिरत लोकांच्या घराबाहेरील गार्डन्स आणि शोभेच्या वस्तूंची नासदूस करतायत. यामुळे रस्ते अपघात होत आहेत. शहरातील अनेक पाळीव प्राण्यासोबत हे उंदीर संघर्ष करताना दिसतायत. त्यामुळे नॉरडेल्टाचे नागरिक या घुसखोर शेकडो उंदरांचा बंदोबस्त कसा करायला या काळजीत आहेत.

जगातील या सर्वात मोठ्या उंदरांना कॅपीबरास ( Capybaras) असे म्हटले जाते. त्यांना वैज्ञानिक भाषेत हाइड्रोकोरस हाइड्रोचेरिस (Hydrochoerus hydrochaeris) असं म्हटलं जाते. काही लोक त्याला कारपिन्चोस (Carpinchos) असेही म्हणतात. या उंदरांचा आकार ४ फूट इतका आहे. तर वजन ७९ किलोग्रॅम इतके आहे. मात्र हे उंदीर गेल्या काही आठवड्यापासून नॉरडेल्टा शहरात बिनधास्तपणे फिरतायत.

- Advertisement -

नॉरडेल्टा या शहराची लोकसंख्या जवळपास ४० हजार इतकी आहे. मात्र या शेकडो उंदारांनी येथील लोकांच्या नाकी नऊ आणलेत. अनेक गार्डन्समधील फुलांचे झाडे आणि शहरातील शोभच्या वस्तूंची नासदूस करत हे उंदीर रस्त्यावर किंवा शहरात कुठेही घाणं करुन ठेवायतय. यामुळे रस्ते अपघातांचे प्रमाण वाढलेय. तसेच पाळीव प्राणी आणि कुत्र्यांवर हल्ला करत आहेत. कॅपीबरास हा हिंस्रक प्राणी नसला तरी तो पाळीव प्राणी आणि नागरिकांवर हल्ला करण्याचा प्रयत्न करतोय.

- Advertisement -

पर्यावरणवाद्यांच्या मते, कॅपीबरास नॉरडेल्टा शहरात घुसखोरी करत नसून ते आपले हक्काचे घर घेण्यासाठी आलेत. १९९० च्या दशकात या नॉरडेल्टा पर्यावरणशास्त्रानुसार अतिशय सुंदर आणि अनेक वन्यप्राण्यांचे घर होते. याठिकाणी एक वेटलँड होते जे पाराना नदीच्या किनाऱ्यावर वसले होते. दक्षिण अमेरिकेतील ही सर्वात मोठी नदी होती. मात्र शहराचा विकास झाला आणि कॅपीबरास यांचे हक्काचे घर गेले.

अर्जेटीनामधील पर्यावरणातील ज्वलंत प्रश्नांसाठी लढणारे प्रसिध्द वकील एनरिक वियेल यांनी सांगितले की, नॉरडेल्टामधील कॅपीबरास प्राण्यांच्या अधिवासात मनुष्य प्राण्याने घुसखोरी केली. श्रीमंत रिअल इस्टेट डेव्हलपर्सने सरकारसह हात मिळवणी करत निसर्गाचा नाश केला. मात्र त्यांनी आवाज उठवण्याचा प्रयत्न केला तेव्हा कोणी त्यांचे ऐकले नाही. निसर्गाच्या सानिध्यात मनुष्याला स्वर्गाप्रमाणे घर देण्याचे स्वप्न दाखवत बिल्डर्सने या प्राण्यांना शहरातून हलकवून दिले.


किम शर्माने लिएंडर पेससोबतच नातं स्विकारत शेअर केला रोमँटिक फोटो


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -