अंबानी ते अमिताभ बच्चन पितात या डेअरीचे दूध; एक लिटर दुधाची किंमत वाचून व्हाल थक्क

महाराष्ट्रातील पुणे शहरात एक आधुनिक आणि हायटेक डेअरी आहे.

world milk day 2022 ambani to amitabh bachchan drink the milk of bhagyalaxmi dairy know the cost of 1 liter milk
अंबानी ते अमिताभ बच्चन पितात या डेअरीचे दूध; एक लिटर दुधाची किंमत वाचून व्हाल थक्क

दरवर्षी 1 जून हा जागतिक दूध दिन म्हणून साजरा केला जातो. दुधाची उपयुक्तता लोकांपर्यंत पोहोचावी आणि त्यांना त्याच्या फायद्यांविषयी माहिती व्हावी, या उद्देशाने हा दिवस साजरा केला जातो. पहिला जागतिक दूध दिवस 1 जून 2001 रोजी साजरा करण्यात आला. दूध शरारीसाठी खूप महत्त्वाचे आहे. यामध्ये अनेक प्रकारचे पोषक घटक असतात. त्यामुळे गरीबांपासून ते श्रीमंतांपर्यंत सर्वजण आपल्या गरजेनुसार दुध पितात. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की अंबानींपासून अमिताभ बच्चनपर्यंतच्या मोठ्या व्यक्तींच्या घरी कोणत्या डेअरीचे दूध येते आणि त्याची किंमत किती असेल?

महाराष्ट्रातील पुणे शहरात एक आधुनिक आणि हायटेक डेअरी आहे. भाग्यलक्ष्मी असे या डेअरीचे नाव आहे. मुंबईसह देशातील अनेक बड्या व्यक्तींच्या घरी याच डेअरीचे दुध पुरवले जाते. भाग्यलक्ष्मी डेअरीच्या ग्राहक यादीत अनेक बड्या सेलिब्रिटींचा समावेश आहे. अंबानी कुंटुंबियांपासून ते सचिन तेंडुकलकर, अमिताभ बच्चन, अक्षय कुमार आणि हृतिक रोशनसारख्या सेलिब्रिटींच्या घरी याच डेअरीचे दूध पोहचवले जाते.

‘या’ एक लिटर दुधाची किंमत काय?

महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील मंचरजवळ भाग्यलक्ष्मी डेअरी आहे. या डेअरीत एक लिटर दुधाची किंमत सुमारे 152 रुपये इतकी आहे. ही डेअरी 35 एकर परिसरात पसरलेली आहे. याठिकाणी 3000 पेक्षा जास्त गायी आहेत. या डेअरीमध्ये दररोज 25 हजार लिटर दुधाचे उत्पादन होते. अत्यंत आधुनिक व स्वच्छ दुग्ध उप्तादन प्रणाली अंतर्गत येथे दुध काढले जाते, दूध उच्च दर्जाचे असल्याची पूर्ण हमी असते.

अंबानी ते अमिताभ बच्चन पितात या डेअरीचे दूध; एक लिटर दुधाची किंमत वाचून व्हाल थक्क
अंबानी ते अमिताभ बच्चन पितात या डेअरीचे दूध; एक लिटर दुधाची किंमत वाचून व्हाल थक्क

देवेंद्र शहा हे या भाग्यलक्ष्मी डेअरी फार्मचे मालक आहेत. पूर्वी त्यांचा कपड्यांचा व्यवसाय होता, पण त्यानंतर त्यांनी एकप्रकारे धाडस करत 175 ग्राहकांसह सर्वप्रथम ‘प्राइड ऑफ काऊ’ लाँच केले. भाग्यलक्ष्मी डेअर फॉर्मचे आजमितीस 25 हजारांहून अधिक ग्राहक आहेत. त्यांचे ग्राहक देशभरातील विविध शहरांतील आहेत. येथील दूध उत्तरेकडून दक्षिण आणि पूर्व ते पश्चिम अशा चारही दिशांच्या शहरांमध्ये पुरवले जाते.

डेअरीत होल्स्टेन फ्रिशियन प्रजातीच्या 3 हजारांहून अधिक गायी आहेत. ही जात स्वित्झर्लंडची आहे. या प्रजातीची गाय दररोज 25-28 लिटर दूध देते. या गायींची किंमत 90 हजार ते दीड लाख रुपयांपर्यंत आहे. गायींची सर्व काळजी घेतली जाते. त्यांच्यासाठी ठेवलेल्या रबर मॅट्स देखील दिवसातून 3 वेळा स्वच्छ केले जातात, या गायी फक्त आरओचे पाणी पितात. तर त्यांना खायला सोयाबिनशिवाय अल्फा गवत, हंगामी भाज्या आणि मक्याचा चारा दिला जायचा. देवेंद्र शहा यांची मुलगी आणि कंपनीचे मार्केटिंग हेड अक्षली शहा यांच्या म्हणण्यानुसार, फ्रीजिंग व्हॅनमधून दररोज पुण्याहून मुंबईला दूध पुरवठा केला जातो. पुण्याहून मुंबईला जायला साडेतीन तास लागतात.


Mega Block : रेल्वेच्या मध्य व हार्बर मार्गावर रविवारी मेगा ब्लॉक