उपासमारीमुळे सात वर्षांच्या चिमुरड्याचा झाला सांगाडा!

Yemeni boy, ravaged by hunger, weighs 7 kg
उपासमारीमुळे ७ वर्षांच्या चिमुरड्याचा झाला सांगाडा!

अन्न खाण्याच्या तीव्र इच्छेला भूक म्हणतात. पण जर ती तीव्र इच्छा पूर्ण झाली नाही तर खूप भयावह अवस्था होते. अशी एक घटना समोर आली आहे. उपासमारीमुळे सात वर्षांच्या चिमुरडाचा सांगाडा झाला असून त्याच्या या भयावह अवस्थेचा फोटो समोर आला आहे. येमेन मधली ही घटना असून या मुलाचे नाव फैयद समीम आहे. पॅरालिसेस आणि कुपोषितेचा शिकार झालेल्या समीमचे वजन सात किलो आहे.

रॉयटर्सच्या वृत्तानुसार, समीमची प्रकृती खूप खालावली होती आणि अनेक समस्येतून त्याचा जीव वाचला. आता त्याला येमेनची राजधानी सानाच्या एका रुग्णालयात ठेवण्यात आले असून त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. अल शबीन रुग्णालयाचे कुपोषण वॉर्डचे सुपरवाइजर डॉक्टर रागेह मोहम्मद म्हणाले की, ‘जेव्हा समीमला इथे आणले गेले तेव्हा त्याच्या जीव जाणार होता. परंतु अल्लाची कृपा, आम्ही मोठी पाऊले उचलून त्याला वाचवू शकलो. आता त्याची प्रकृती चांगली आहे.’

पुढे डॉक्टरने सांगितले की, ‘समीम हा सेरब्रल पॉल्जी आणि गंभीर कुपोषणचा शिकार आहे. येमेनची राजधानी सानाच्या रुग्णालयात समीमला दाखल करण्यासाठी त्याच्या कुटुंबियांनी तुटलेले रस्ते आणि चेकप्वाइंट पार करत १७० किमीचा प्रवास केला. समीमवर उपचार करण्यासाठी त्याच्या कुटुंबियांकडे पैसे नव्हते. त्याचे कुटुंब डोनेशनवर अवलंबून होते.’ स्थानिक हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी सांगितले की, ‘देशातील कुपोषित मुलांची संख्या वाढत आहे.’

संयुक्त राष्ट्रच्या माहितीनुसार, येमेन देश जगभरातील सर्वात मोठे मानवी संकटाचा सामना करत आहे. येमेनमध्ये दुष्काळ जाहीर झाला नसून, ६ वर्षांच्या युद्धानंतर देशातील ८० टक्के लोकं मदतीवर अवलंबून आहेत. संयुक्त राष्ट्रांच्या प्रयत्नांमुळे २०१८च्या अखेरीस मदत कार्याला वेग आला होता. परंतु नंतर कोरोनाच्या निर्बंधामुळे अडचणी आल्या. पूर आणि इतर कारणांमुळे येमेनमधील परिस्थितीही बिकट झाली.


हेही वाचा – कॅबमध्ये प्रवाशाने मास्क लावण्यास दिला नकार, चालकाने शिकवला चांगलाचं धडा