Wednesday, July 28, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर ट्रेंडिंग पाण्याखाली असलेले टायटॅनिक पाहता येणार, मोजावे लागतील एवढे पैसे

पाण्याखाली असलेले टायटॅनिक पाहता येणार, मोजावे लागतील एवढे पैसे

टायटॅनिक या सिनेमातून आपण टायटॅनिक कसे होते हे पाहिले. परंतु आता टायटॅनिक प्रत्यक्षात पाहता येणार आहे.

Related Story

- Advertisement -

टायटॅनिक एक सुंदर आणि आकर्षक जहाज. टायटॅनिक चित्रपट आल्यानंतर अनेकांना या जहाजाची कहाणी समजली. अथांग समुद्रात थाटात मिरवणारे टायटॅनिक हे जगातील सर्वात सुंदर जहाज होते. जहाजावर रंगलेल्या जॅक आणि रोझची प्रेमकहाणी आपण सिनेमातून पाहिली आहे. टायटॅनिक या सिनेमातून आपण टायटॅनिक कसे होते हे पाहिले. परंतु आता टायटॅनिक प्रत्यक्षात पाहता येणार आहे. मात्र त्यासाठी ९३ लाख रूपये मोजावे लागणार आहेत. जवळपास १२ हजार ४६७ फूट खोल पाण्यात जाऊन टायटॅनिकची सफर करता येणार आहे.

पाण्याखाली बुडालेल्या टायटॅनिक जहाजाचा शोध घेणाऱ्या एका कंपनीने Titanic survey expedition 2021ची घोषणा केली आहे. यातून टायटॅनिकप्रेमींना टायटॅनिकची सफर करता येणार आहे. पाण्याखाली असलेल्या टायटॅनिक जहाजाच्या संशोधनासाठी नागरिक विशेष तज्ज्ञांना मिशन विशेष तज्ज्ञ म्हणून प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या मिशनची सुरूवात जुलैच्या मध्यापासून ते मे महिन्याच्या शेवटापर्यत होणार आहे. हे मिशन १०दिवस चालणार असून यात ५ पाणबुडी चालक असणार आहेत. जहाज ज्या ठिकाणी पडले तिथपर्यत घेऊन जाईल. अशाच प्रकारचा आणखी एक उपक्रम २०२२ मध्ये आणला जाईल, असे सांगितले जात आहे.

- Advertisement -

प्रत्येक मिशनवर जाणाऱ्या ९ वैज्ञानिकांना विशेष मंजुरी दिली जाणार आहे. त्यातील ५ व्यक्तींना केवळ तीन मिशन विशेष तज्ज्ञांनी मंजुरी देण्यात येणार आहे. १९१२ साली ब्रिटीशांनी हे जहाज बनवले होते. १९१२ च्या १४-१५ एप्रिलला हे जहाज लंडनहून न्यूयॉर्क शहराकडे प्रवासासाठी निघाले होते. या जहाजाबद्दल असे म्हटले जायचे की, हे जहाज कधीच बुडणार नाही पण काळाने घात केला आणि आलिशान टायटॅनिक जहाज उत्तर अटलांटिक महासागरात हिमनगावर आदळून समुद्रात बुडाले. टायटॅनिक बांधण्यासाठी अनेक अनुभवी इंजिनिअर्सचा हात होता. ते भव्य टायटॅनिक आता नसले तरी त्याचे पाण्याखाली असलेले अवशेष पाहता येणार आहेत.


हेही वाचा – भारतातली पहिली खासगी रेल्वे ‘तेजस’ एक्स्प्रेस बंद होणार!

- Advertisement -