घरUncategorizedविद्युत दाहिनीत वर्षभरात ६०० अंत्यसंस्कार

विद्युत दाहिनीत वर्षभरात ६०० अंत्यसंस्कार

Subscribe

वायू प्रदूषणाचा स्तर कमी व्हावा यासाठी स्मार्ट सिटी अंतर्गत पंचवटीत विद्युत शव दाहिनी सुरू करण्यात आली

वायू प्रदूषणाचा स्तर कमी व्हावा यासाठी स्मार्ट सिटी अंतर्गत पंचवटीत असलेल्या अमरधाममध्ये वर्षभरापूर्वी विद्युत शव दाहिनी सुरू करण्यात आली. दाहिनीत अंत्यसंस्कार करण्याला प्रतिसाद वाढत आहे. वर्षभरात या दाहिनीत 600 अंत्यविधी पार पडले. या शवदाहिनीच्या वापरामुळे लाकडाचीही मोठ्या प्रमाणावर बचत होत आहे.

गेल्या वर्षभरात साधारणपणे प्रतिमाणसी 340 किलो लाकडाची बचत म्हणजेच वर्षभरात 2 लाख 4 हजार किलो लाकडाची बचत झाली आहे. केवळ लाकडाचीच बचत झाली नाही, तर वायुप्रदूषणही काही प्रमाणात थोपवण्यास याद्वारे मदत होत आहे. विद्युत शव दाहिनीमध्ये अंत्यसंस्कारासाठी 5 ते 10 युनिट खर्च होत असल्याने वीजेचा वापरही मर्यादीत होत आहे. येणार्‍या काळात नाशिककरांकडून विद्युत शवदाहिनीचाच मोठ्या प्रमाणात वापर होऊन पर्यावरण संवर्धनात हातभार लागेल, असा विश्वास स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश थवील यांनी व्यक्त केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -