घरUncategorizedनटबोल्टशिवाय धावली एस.टी.! धावत्या एसटीत चाक निखळले!

नटबोल्टशिवाय धावली एस.टी.! धावत्या एसटीत चाक निखळले!

Subscribe

श्रीगोंदा एसटी आगारातून नटबोल्टशिवाय सोडलेली एसटी काही कि.मी. धावली. त्यानंतर एसटीचे चाक निखळले. घडल्याप्रकरणी सहाय्यक यांत्रिकी एस. आगवणे यांना निलंबित करण्यात आले आहे. तसेच चालक पाळीप्रमुख व दोन सहाय्यक या 3 जणांवर दोषारोप ठेवण्यात आले आहेत.

एका ट्रक चालकाच्या प्रसंगावधनाने मोठा अनर्थ टळला. ज्यामुळे बसगाडीतील प्रवासी बचावले, मात्र या प्रकरणी आगारप्रमुखांनी तातडीने निलंबनाची करवाई केली. श्रीगोंदा आगारातून नोकरदार वर्गासाठी सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास श्रीगोंदा दौंड ही पहिली गाडी सुटली. त्या गाडीची रात्री दुरुस्ती करण्यात आली होती. मात्र गाडीच्या चाकांना नटबोल्ट लावण्यात आले नव्हते. अशाच स्थितीत ही गाडी काष्ठी गावापर्यंत धावली. त्यानंतर काही अंतरावर एसटीचे मागचे एक चाक गळून पडले. तशीच गाडी निमगाव खलू गावापर्यंत पोहचली. त्यावेळी मागून आलेल्या टेम्पो चालकाने ही बाब एसटी चालकाला सांगितली.

- Advertisement -

घडल्या प्रकरणामुळे सहाय्यक यांत्रिकी एस. आगवणे यांना निलंबित करण्यात आले आहे. तसेच चालक पाळीप्रमुख व दोन सहाय्यक या 3 जणांवर दोषारोप ठेवण्यात आला असून चौकशी दरम्यान दोषी आढळणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कठोरात कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती आगारप्रमुख यांनी दिली आहे.

जलतरण तलावात मस्ती, एकाचा मृत्यू

Swimming Pool accident
जलतरण तलावात एकाचा मृत्यू अकाचा

श्रीगोंदा शहरातील मांडवगण रस्त्यावरील गोविंदराज कॉम्प्लेक्समध्ये राहणारा महेश राजू चव्हाण वय 22 वर्षे या तरुणाचा आज दुपारी श्रीगोंद्यातील महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयातील जलतरण तलावात बुडून मृत्यू झाला. मित्रमंडळी एकमेकांना बुडवण्याचा खेळ खेळत असतांना या मस्तीत राजुचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे श्रीगोंद्यात शोककळा पसरली आहे.

- Advertisement -

महेश चव्हाण हा तरुण दुपारी तीन वाजता मित्रांसोबत या महाविद्यालयात पोहोण्यासाठी गेला होता. त्यावेळी तेथे 40 ते 50 मूल पोहत होती, परंतु दुपारी चार वाजता महिलांची बॅच सुरू होणार असल्यामुळे तेथील कर्मचारी मालजपते यांनी सर्व मुलांना बाहेर काढले व जलतरण तलाव पुन्हा एकदा चेक केला असता त्यांना जलतरण तलावाच्या बाजूला बूट व कपडे दिसले. याचा संशय आल्यामुळे त्यांनी तपासणी केली असता जलतरण तलावात तळाशी एका तरुणाचा मृतदेह असल्याचे दिसले. हा जलतरण तलाव चार दिवसांपूर्वीच पुणे येथील तेजपूल एजन्सीला भाडेतत्वावर चालवण्यासाठी दिला होता. परंतु आजच्या या घटनेबाबत काही तरुण याठिकाणी पाण्यात मस्ती करत असल्याची माहिती समजली.

या ठिकाणी येणाऱ्या तरुणांना पोहता येते की नाही. त्याला लाईफ जॅकेट दिले होते का नाही, यावरून आता सोशल मीडियातून प्रश्न विचारले जात आहेत. या तरुणाचा जीव गेल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. या ठिकाणी काही तरुण एकमेकांमध्ये बुडवाबुडवीचा खेळ खेळत पाण्यात मस्ती करत होते. तिच मस्ती या तरुणाच्या जिवावर बेतल्याची शक्यता व्यक्त होत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -