घरUncategorizedआणि मदतीला धावले 'आनंद महेंद्रा'...

आणि मदतीला धावले ‘आनंद महेंद्रा’…

Subscribe

धावपटू 'हिमा'ला ऑलंपिकच्या तैयारीसाठी अर्थिक मदत देण्याची केली घोषणा.

फिनलँडमध्ये पार पडलेल्या अंडर २० ‘जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप’ स्पर्धेत ४०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत विक्रम करणारी हिमा दास प्रथम भारतीय ठरली. हिमाच्या मिळालेल्या यशानंतर महिंद्रा अॅण्ड महिंद्रा कंपनीचे चेअरमॅन आणि उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी आर्थिक मदत करण्याची घोषणा केली आहे. नुकतेच या संबधी त्यांनी ट्विटवरुन माहिती दिली आहे. पुढील स्पर्धेच्या तैयारीसाठी ही मदत केली जाणार आहे. हिमा दासने ५१.४६ सेकंदात ४०० मीटर धावण्याची पूर्ण केली होती. या रेकॉर्ड नंतर सर्वांकडून तीचे कौतूक करण्यात आले होते. हिमाने वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या ‘ट्रॅक इव्हेंट’मध्ये भारताला मिळवून दिलेल्या सुवर्णपदकामुळे तिच्या अगदी पंतप्रधान मोदीपासून ते बीगबी बच्चनपर्यंत सर्वांकडूनच शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. आनंद महिंद्राने केलेल्या ट्विटचे लोकांनी स्वागत केले आहे.

ट्विटवरील मजकूर
आनंद महिंद्रांनी लिहिले आहे की,”आम्ही सर्वेच हिमाला ऑलंपिक मैदानात बघण्यास उत्सुक आहोत. मदती अभावी हिमाच्या तैयारीत काही अडचन येत असेल तर सरकारी मदती पलीकडे जाऊन तीची मदत करण्यास आम्हाला आनंद होऊल.” याच बरोबत त्यांनी युवा कल्याण आणि क्रिडा मंत्री राज्यवर्धन राठेड यांनाही श्रेय दिले आहे. खेळाडूंना मदत करण्यासाठी आनंद महिंद्राची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही आनंद महिंद्रायांनी अनेक खेळाडूंना मदत केली आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -