घरUncategorizedबर्थ डे पार्टीत गुंगीचे औषध देऊन तरूणीवर बलात्कार

बर्थ डे पार्टीत गुंगीचे औषध देऊन तरूणीवर बलात्कार

Subscribe

वाढदिवसाच्या पार्टीला नेऊन एका तरूणीवर तीन तरुणांनी बलात्कार केल्याची घटना आंध्र प्रदेशच्या अग्रिपल्लीमध्ये घडली आहे. या तरुणीला कोल्ड्रिंक्समधून गुंगीचे औषध पाजून तिच्यावर अत्याचार करण्यात आले. या प्रकारानंतरही अश्लिल चित्रफीत बनवून तिच्याकडे वारंवार शरीरसुखाची मागणी करण्यात येत होती. अखेर घडला प्रकार सागून तरुणीने आरोपींविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली.

कोल्ड्रिंक्समधून गुंगीचे औषध देऊन इंजिनिअर विद्यार्थ्यांनी तरुणीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना आंध्र प्रदेशमध्ये घडल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी पीडितेने आरोपींवर गुन्हा दाखल केला असून सिवा रेड्डी आणि क्रिष्णा वामसी या विद्यार्थ्यांना आंध्र प्रदेश पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली आहे. आरोपींनी पीडित तरुणीचा अश्लिल व्हिडिओ काढून त्याद्वारे अनेक वेळा ब्लॅकमेल केल्याचा आरोप पीडित तरुणीने केला आहे.

नेमके काय झाले?

आंध्र प्रदेशमधील क्रिष्णा जिल्ह्यातील अग्रिपल्लीमध्ये या विद्यार्थिनीवर फेब्रुवारी २०१७ साली माजी विद्यार्थ्यांनी बलात्कार केल्याची घटना उघड झाली आहे. एका वाढदिवसाच्या पार्टीला सिवा रेड्डी आणि क्रिष्णा वामसी सदर तरुणीला घेऊन गेले होते. या पार्टीमध्ये तरुणीला विद्यार्थ्यांनी कोल्ड्रिंकमधून गुंगीचे औषध मिसळून पाजले. पीडित तरूणी शुद्ध हरपल्यानंतर याच संधीचा फायदा घेत या दोन आरोपींनी तरुणीवर बलात्कार करुन अश्लिल व्हिडिओ तयार केला. तसेच ‘तुझा व्हिडिओ वेबसाईटवर टाकू’ असे पीडितेला धमकवत तिच्याकडे वारंवार शरीरसुखाची मागणी करत होते. सतत ब्लॅकमेल होत असल्याने अखेर तिने घडलेला सर्व प्रकार कुटुंबियांना सांगत पोलिस ठाण्यात धाव घेतली.

- Advertisement -

याप्रकरणी पोलिसांनी सिवा रेड्डी आणि क्रिष्णा वामसी या विद्यार्य्थांना ताब्यात घेत त्यांची कसून चौकशी केली. या आरोपींकडील मोबाईल ताब्यात घेतले असून ज्या ठिकाणी या आरोपींनी बलात्कार केला तिथली तपासणीही पोलीस करत असल्याची माहिती देण्यात आली आहे.

आरोप-प्रत्यारोप

‘या सरकारने महिलांच्या सुरक्षेबाबत कोणतीही ठोस पावले उचलली नाहीत’ असे सांगत आंध्र प्रदेशातील विरोधी पक्ष वायएसआरसीपीने टीडीपी सरकारवर जोरदार टीका केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -