घर Uncategorized दुचाकीच्या भीषण अपघातात जवानासह चौघांचा मृत्यू

दुचाकीच्या भीषण अपघातात जवानासह चौघांचा मृत्यू

Subscribe

देवास जिल्ह्याच्या सोनकच्छ येथे काल रात्री एकच्या सुमारास झालेल्या अपघातात पाचजणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. इंदोर-भोपाल हायव्हेवर ही घटना घडली असून या घटनेतील मृतांमध्ये एका जवानाचाही समावेश असल्याची माहिती उघडकीस आली आहे. दुचाकीवरुन जात असताना ट्रकने धडक दिल्यामुळे हा अपघात झाला. अचानक ट्रकसमोर आल्यामुळे दुचाकी चालकाचा ताबा सुटला आणि दुचाकीने ट्रकला धडक दिली असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. दरम्यान या घटनेत अपघाताची नोंद करण्यात आली असून ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतले असून शवविच्छेदनानंतर त्यांच्यावर अंत्यविधी करण्यात येणार आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार या अपघातात जवान सुमेरसिंह त्याचे वडिल मिसरसिंह सेंधव (३५), दिलीपसिंह (३०),नारायणसिंह भाटी(४०) आणि सोभालसिंह (४०) यांचा जागीच मृत्यू झाला आहे. हे सर्वे झाडखेडी परिसरातील रहिवाशी आहेत. घरी परतत असताना त्यांचा अपघात झाला. अपघातानंतर ट्रकचालकाने घटनास्थळावरुन पळ काढला. या प्रकरणी पोलिसांनी ट्रकचालकाविरोधात गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध सुरु केला आहे.

- Advertisement -

जवानांची तुकडी आल्यानंतर केल्या जाणार अंत्यविधी
सोनकच्छ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जवान सुमेरसिंह अंबाला येथे रुजू होते. नुकतेच रजा घेऊन ते आपल्या घरी परतले होते. त्यांच्या मृत्यूची बातमी मिळाल्यानंतर महू येथील जवान त्यांच्या अत्यविधीसाठी येत आहेत. त्यांचे अंत्यविधी शासकीय इतमाम करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -