घरUncategorized‘गर्ल्स लॉकर रूम’ चॅट सोशल मीडियावर व्हायरल, ग्रुपमध्ये मुलांचे आक्षेपार्ह फोटो!

‘गर्ल्स लॉकर रूम’ चॅट सोशल मीडियावर व्हायरल, ग्रुपमध्ये मुलांचे आक्षेपार्ह फोटो!

Subscribe

सोशल मीडियावर ग्रुप चॅटचे काही स्क्रीनशॉट पोस्ट केले आहेत, ज्यात मुली पुरुषांबद्दल, मुलांबद्दल अश्लील गोष्टीं विषयी बोलताना दिसत आहेत.

सोमवारी सकाळी #Boyslockroom हा हॅशटॅग ट्वीटरवर ट्रेण्ड होत होता. आता ‘बॉईज लॉकर रूमनंतर’ आता ‘गर्ल्स लॉकर रूम’ चॅट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ट्वीटर आता पर #Girlslockeroom हा हॅशटॅग ट्रेण्ड होत आहे.

- Advertisement -

#Boyslockerroom या इन्स्टाग्रामवरील ग्रुपवर शाळेतील मुलांनी अश्लील चॅट केले होते. या ग्रुपवर गँग रेपविषयी चर्चा करण्यात आली होती. पोलीसांनी या व्हायरल चॅटनंतर मुलांविरोधात गुन्हा दाखल केला होता. आता ‘गर्ल्स लॉकर रूम’ चॅट सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मुलींवरही कारवाई व्हावी अशी मागणी होत आहे. ‘गर्ल्स लॉकर रूम’ चॅट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे यामध्ये काही मुली मुलांच्या प्रायव्हेट पार्टबद्दल अश्लील चर्चा करत आहेत.

- Advertisement -

सोशल मीडियावर याविषयी चर्चा रंगली आहे. यात आरोप केला जात आहे की,  हा ग्रुप केवळ मुली आणि महिलांकरीता आहे आणि ग्रुपमध्ये पुरूषांविषयी अपमानास्पद बोलले जाते.

एका व्यक्तीने सोशल मीडियावर ग्रुप चॅटचे काही स्क्रीनशॉट पोस्ट केले आहेत, ज्यात मुली पुरुषांबद्दल, मुलांबद्दल अश्लील गोष्टीं विषयी बोलताना दिसत आहेत. मुलींच्या ग्रुप चॅटवरील स्क्रीनशॉटमध्ये पुरुषांचे आक्षेपार्ह फोटो आहेत.


हे ही वाचा – ग्रुप चॅट वर गँगरेपची चर्चा; चॅट व्हायरल झाले आणि…


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -