मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगली, कोल्हापूरच्या पुर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी रवाना

CM Devendra Fadnavis’ aerial survey to review the flood situation of Sangli and Kolhapur

महाराष्ट्रातील अनेक भागात सध्या भीषण पुर परिस्थिती आहे. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील अनेक गावांना पुराच्या पाण्याने वेढले आहे. यातच आज सांगलीच्या पळूस तालुक्यातील ब्रह्मनाळ येथे मदतकार्य करणारी बोट उलटून १६ जण बुडाले आहेत, यापैकी ९ जणांचे मृतदेह सापडले असून इतरांचा शोध सुरु आहे. या भीषण पुरस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि सार्वजनिक आरोग्य मंत्री एकनाथ शिंदे लष्कराच्या हेलिकॉप्टरने रवाना झाले आहेत.

कोल्हापूरमध्ये सध्या २२ पथके बचाव कार्य करत आहेत. यापैकी एनडीआरएफचे ५, नौदलाचे १४, कोस्टगार्डचे १, लष्कराचे १, एसडीआरएफचे १ पथक काम करत आहे.

सांगलीसाठी ११ पथके बचाव कार्य करत आहेत. यामध्ये एनडीआरएफचे ८, कोस्टगार्डचे २ आणि लष्कराचं १ पथक काम करत आहे.