घरUncategorizedबीएसएफतर्फे जवानाला लग्नाची भेट, जाळलेले घर देणार बांधून

बीएसएफतर्फे जवानाला लग्नाची भेट, जाळलेले घर देणार बांधून

Subscribe

देशाच्या सन्मानासाठी आणि रक्षणासाठी सैनिक आपल्या प्राणांची बाजी लावत असतात. मात्र, दिल्लीमध्ये दंगलखोरांनी एका बीएसएफच्या जवानाचे घर जाळल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे.

दिल्ली हिंसाचाराने गेल्या काही दिवसांमध्ये अनेकांचा जीव घेतला. राजधानी दिल्लीतील जीवन आता हळूहळू आणि स्थिरतेने पुढे जात आहे. या हिसांचारादरम्यान माणुसकीला काळीमा फासणाऱ्या अनेक घटना घडल्या. अनेक निष्पापांचे बळी गेले. अशातच देशाच्या सन्मानासाठी आणि रक्षणासाठी सैनिक आपल्या प्राणांची बाजी लावत असतात. मात्र, दिल्लीमध्ये दंगलखोरांनी एका बीएसएफच्या जवानाचे घर जाळल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे.

घर उभारून देण्यासाठी सर्वतोपरी मदत

मोहम्मद अनिस असे घर जाळण्यात आलेल्या जवानाचे नाव असून ते बीएसएफमध्ये सेवेत आहेत. दिल्लीत दंगल भडकल्यावर खजूरी खास परिसरात असलेले अनिस यांचे घरही दगंलखोरांनी पेटवून दिले. यामध्ये अनिस यांचे कुटुंबीय थोडक्यात बचावले आहे. मात्र घर पूर्णपणे बेचिराख झाले आहे. दरम्यान ही बाब बीएसएफमधील वरिष्ठांना समजल्यानंतर त्यांनी या जवानाची मदत करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. बीएसएफने एका जवानाच्या माध्यमातून अनिस यांच्या वडिलांशी संपर्क साधला आहे. जवानाचे घर उभारून देण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्यात येईल. तसेच इंजिनियरींग विभागाचे पथक अनिस यांच्या घराची पाहणी करत आहेत.

- Advertisement -

बीएसएफ वेल्फेअर फंडातून पाच लाख रूपयांचा धनादेश

जवान मोहम्मद अनिस हे २०१३ मध्ये बीएसएफमध्ये दाखल झाले. तीन वर्ष जम्मू काश्मीरमध्ये त्यांनी सेवा दिली तर सध्या ते ओडिशामध्ये कार्यरत आहेत. अनिस यांना बीएसएफ वेल्फेअर फंडातून पाच लाख रूपयांचा धनादेश दिला जाईल. तीन महिन्यानंतर विवाह असलेल्या अनिस यांना आमच्याकडून ही भेट असेल, असे बीएसएफच्या डीजींनी सांगितले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -