घरUncategorizedश्वेता शिंदे आणि देवदत्त नागे यांच्या जुळणार गाठी

श्वेता शिंदे आणि देवदत्त नागे यांच्या जुळणार गाठी

Subscribe

देवदत्त नागे आणि श्वेता शिंदे लवकरचं 'झी युवा'वरील 'डॉक्टर डीन' या मालिकेत मुख्य भूमिकेत झळकणार आहे. us दोन्ही कलाकार पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहेत.

‘कुमकुम’, ‘घराना’ यांसारख्या हिंदी आणि ‘चार दिवस सासूचे’, ‘अवघाचि संसार’ आणि ‘लक्ष्य’ यांसारख्या मराठी मालिकांतील भूमिकांमुळे प्रेक्षकांना परिचित असलेली अभिनेत्री म्हणजे श्वेता शिंदे. तसेच ‘लागिरं झालं जी’ या मालिकेची निर्मातीसुद्धा तीने केली होती. अशातच डॉक्टर डॉन ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. विशेष म्हणजे या मालिकेमध्ये अभिनेता देवदत्त नागे आणि श्वेता शिंदे मुख्य भूमिकेत झळकणार आहे. हे दोन्ही कलाकार पहिल्यांदाच एकत्र काम करताना दिसणार आहेत.

श्वेता शिंदे आणि देवदत्त नागे नव्या भूमिकेत

जय मल्हार’ या मालिकेमुळे देवदत्त नागे प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचला. त्यानंतर नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘तान्हाजी : द अनसंग वॉरिअर’ या चित्रपटातही तो दिसून आला. आता त्याने पुन्हा एकदा आपला मोर्चा छोट्या पडद्याकडे वळविला आहे. डॉक्टर डीन या मालिकेत तो मुख्य भूमिकेत झळकणार आहे. अलिकडेच या मालिकेचा प्रोमो प्रदर्शित झाला. यामध्ये देवदत्त आणि श्वेता अत्यंत मजेशीर अंदाजात दिसून येत आहेत. हा प्रोमो अतिशय मजेशीर असून यात श्वेता शिंदे या एका हॉस्पिटलच्या डीनचा रोल साकारत आहेत. तर देवदत्त नागे ‘देवा’ ही भूमिका साकारत आहे. ही मालिका १२ फेब्रुवारीपासून सोमवार ते रविवार रात्री ९ वाजता ‘झी युवा’वर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -