इमिरेटसमध्ये मिळणार ‘हिंदू मिल’, एकाच दिवसात घुमजाव

आता इमिरेटसने प्रवास करणाऱ्यांना आता काळजी करण्याचे कारण नाही. आता तुम्हाला हवे असलेले जेवण इमिरेटसमध्ये मिळणार आहेत.

emirates
फोटो प्रातिनिधीक आहे.

इमिरेटस विमान कंपनीने अगदी कालच प्रवाशांना विमानात हिंदू मिल मिळणार नाही असा निर्णय घेतला होता. पण अवघ्या २४ तासात त्यांनी घुमजाव केला आहे. आता विमानात हिंदू मिल मिळणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे आता इमिरेटसने प्रवास करणाऱ्यांना आता काळजी करण्याचे कारण नाही. आता तुम्हाला हवे असलेले जेवण इमिरेटसमध्ये मिळणार आहेत.

नेमका निर्णय काय होता?

दुबईतील इमिरेटस विमान कंपनीने प्रवाशांसाठी ‘हिंदू मिल’ची सुविधा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. अनेक आंतरराष्ट्रीय विमानसेवांमध्ये प्रवाशांना त्यांच्या आवडीनुसार जेवणाची सुविधा उपलब्ध असते. पण इमिरेटसने हिंदू मिल बंद करुन हिंदू मिल घेऊन इच्छिणाऱ्यांनी अन्य देशाचे शाकाहारी जेवण निवडावे असे सांगण्यात आले होते. त्यामुळे एमिरेटसमध्ये प्रवास करणाऱ्या हिंदू प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली होती. आंतरराष्ट्रीय विमान प्रवासात अन्य कोणतेही जेवण शक्य होणार नाही. त्यामुळे ही सेवा बंद करण्याचा निर्णय का? असा प्रश्न प्रवाशांनी उपस्थित केला होता.

‘हिंदू मिल’ म्हणजे नेमकं काय?

जगभरातील विमान कंपन्यांमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी अशा दोन्ही प्रकारच्या जेवणाचा पर्याय उपलब्ध असतो. प्रामुख्याने बीफ (बैलाचे) आणि पोर्क (डुकराचे) मांसापासून बनवलेल पदार्थ मिळतात. हिंदू धर्मात बैल निषिद्ध आहे. तर अनेक जण डुक्कर खात नाही. अशावेळी हिंदू मिलमधील मासांहारामध्ये असणारे चिकन आणि अंडी हे पदार्थ खाल्ले जातात. शिवाय शाकाहारीमध्ये पर्याय असतोच. हिंदू मिलचा पर्याय एअर इंडिया आणि सिंगापूर एअरलाईन्समध्ये सात्विक जेवणाची सोय आहे.

इमिरेटसची सेवा

इमिरेटस मुंबई,अहमदाबाद, बंगळुरु, चेन्नई, दिल्ली, कोलकाता, कोची, तिरुअनंतपुरम अशी सेवा पुरवते. शिवाय जेवणाबदद्ल सांगायच झाले तर इमिरेटमध्ये शाकाहारी, जैन असे जेवणाचे प्रकार मिळतात, अशी माहिती एमिरेटसच्या साईटवर देण्यात आली आहे.