गॅस गिझरचा स्फोट : युवकाचा मृत्यु

नाशिक । बाथरूममध्ये गॅझ गिझरचा स्फोट होउन युवकाचा जीव गुदमरून मृत्यु झाला. नविन नाशिक येथील दौलतनगर येथे ही घटना घडली. येथील वृंदावन अपार्टमेंट मधील रहीवासी गौरव समाधान पाटील (वय २७) हा युवक दुपारी चार वाजेच्या सुमारास बाथरूम मध्ये असताना बाथरूम मधील गॅस गिझर अचानकपणे फुटले. त्यामुळे गौरव यास श्वास घेण्यास त्रास होऊ लागला हा प्रकार त्याच्या भावाच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीने त्याला रुग्णालयात दाखल केले.नववर्षाच्या सुरूवातीलाच अशी घटना घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.