घरUncategorizedआता विमानातही बिनधास्त वापरा मोबाईल आणि इंटरनेट

आता विमानातही बिनधास्त वापरा मोबाईल आणि इंटरनेट

Subscribe

भारतीय विमानांमध्येही वायफाय सुविधा पुरविण्यास सरकारने परवानगी दिली आहे. २१ फेब्रुवारीच्या अधिसूचनेनुसार प्रवाशांना विमानात बसल्यानंतर वायफाय सेवेच्या माध्यमातून इंटरनेट साधने वापरता येतील.

बऱ्याचदा विमानातून प्रवास करायलाही आपल्याला कंटाळा येतो. कारण आपला मोबाईल फ्लाईट मोडवर असल्याने इंटरनेट बंद त्यामुळे वेळ घालवण्यासाठी काही पर्यायच उरत नाही. मात्र आता विमान प्रवाशांसाठी खुशखबर आहे. भारत सरकारने विमानात वायफाय सेवा पुरवण्यास परवानगी दिली आहे.

विमानप्रवासामध्ये मोबाइल फोन वापरणे तसेच इंटरनेट सुविधा देण्याबाबतच्या नियमांची अधिसूचना लवकरच काढण्यात येईल, अशी माहिती केंद्रीय दूरसंचार मंत्री मनोज सिन्हा यांनी काही दिवसांपूर्वी दिली होती. याला मंजूरी मिळाली असून विमानातही वायफाय सेवा पुरवण्यात येणार आहे. सोमवारी हा निर्णय जाहीर करण्यात आला. २१ फेब्रुवारीच्या अधिसूचनेनुसार प्रवाशांना विमानात बसल्यानंतर वायफाय सेवेच्या माध्यमातून इंटरनेट साधने वापरता येतील. आतापर्यंत विमानात वाय-फाय सेवा नव्हती आणि स्मार्टफोनही फ्लाईट मोडवर ठेवायला संमती होती. मात्र आता विमान प्रवासात प्रवाशाचा स्मार्टफोन, लॅपटॉप, टॅब्लेट, स्मार्टवॉच फ्लाइट मोडवर असेल तर त्याला वाय-फाय सेवा उपलब्ध करून देण्याचा अधिकार वैमानिकाला असेल, असे केंद्र सरकारकडून काढण्यात आलेल्या अधिसूचनेत स्पष्ट केले आहे.

- Advertisement -

वाय-फाय सेवा देणारी ‘विस्तारा’ पहिली विमान कंपनी

विमानात ही वाय-फाय सेवा मिळणार असल्याने प्रवाशांना आता इंटरनेटचा वापर करून व्हिडिओ पाहणे, चॅट करणे, तसेच संभाषण करणे आता शक्य होणार आहे. वाय-फाय शिवाय मात्र हे करणे शक्य होणार नाही. ही सेवा देणारी ‘विस्तारा’ ही पहिली विमान कंपनी असेल. विस्ताराच्या विमानात ही सेवा देण्यासंदर्भात पॅनासॉनिक एव्हिओनिक्स आणि टाटा समूहाच्या नेल्को लिमिटेड यांच्यात अलीकडेच करार झाला होता. त्यामुळेच एअर विस्तारामध्ये वाय-फाय सेवा सर्वात आधी मिळू शकणार आहे. कंपनीच्या बोइंग ७८७-९ या ड्रीमलाइनरमध्ये प्रवाशांना आम्ही सुविधा देऊ असे विस्ताराने म्हटले आहे. मात्र, टप्प्याटप्प्याने देशातील अन्य विमान कंपन्यांही निश्चितच ही सेवा आपल्या प्रवाशांना देतील यात शंका नाही.


हेही वाचा- आता नवीन वाहने रस्त्यावर येऊ शकणार नाहीत!

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -