अशीही टीम इंडियाची विमानातली मस्ती!!!

कर्णधार विराट कोहली पासून ते विकेट-किपर दिनेश कार्तिक पर्यंत सर्वांकडेच जात हार्दिक आणि चहलने मस्ती केली आहे.

fun in plane
भारतीय संघांने केली विमानात मस्ती

इंग्लंड आणि भारत यांच्यातील टूरचे सामने ३ जुलैपासून सुरू होणार आहेत. यासाठी भारताचा संघ नुकताच लंडनमध्ये दाखल झाला. त्यावेळी लंडनला जाताना भारतीय संघाने विमानात केलेल्या मजामस्तीचा एक व्हिडिओ बीसीसीआयने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये भारताचा ऑलराऊंडर प्लेअर हार्दीक पांड्या आणि युझवेंद्र चहल इतर प्लेअर्सची मुलाखत घेताना दिसत आहे. या मुलाखतीदरम्यान सगळेच प्लेअर्स मस्ती करत आहेत. अगदी कर्णधार विराट कोहलीपासून ते दिनेश कार्तिकपर्यंत सर्वांकडेच आपला कॅमेरा फिरवत हार्दीक आणि चहलने मस्ती केली आहे. सर्वच प्लेअर्स यामध्ये सहभागी झाले.

असा असेल भारताचा इंग्लंड दौरा

भारताच्या इंग्लंड दौऱ्यात टी-२०, तीन वन-डे आणि पाच कसोटी सामने खेळण्यात येणार आहेत. ३ जुलैपासून सुरू होणाऱ्या या दौऱ्यात ३ जुलै, ६ जुलै आणि ८ जुलै ला टी-२० सामने खेळवले जाणार आहेत. तर १२ जुलै, १४ जुलै आणि १७ जुलैला वन-डे खेळवण्यात येईल. तर १ ऑगस्ट ते ११ सप्टेंबरपर्यंत कसोटी सामने खेळण्यात येतील.

virat dhoni eng
भारताचा संघ इंग्लंड दौऱ्यासाठी सज्ज

इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघात खेळणाऱ्या खेळाडूंची नावे

एक दिवसीय सामना – विराट कोहली (कर्णधार), एम एस धोनी, शिखर धवन, रोहित शर्मा, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, दिनेश कार्तिक, कुलदीप यादव, वॉशिंगटन सुंदर, युझवेंद्र चहल, जसप्रित बुमराह, सिद्धार्थ कौल, हार्दिक पांड्या, सुरेश रैना, उमेश यादव, भुवनेश्वर कुमार.

टी-२० सामना – विराट कोहली (कर्णधार), एम एस धोनी, शिखर धवन, रोहित शर्मा, लोकेश राहुल, मनीष पांडे, दिनेश कार्तिक, कुलदीप यादव, वॉशिंगटन सुंदर, युझवेंद्र चहल, जसप्रित बुमराह, सिद्धार्थ कौल, हार्दिक पांड्या, सुरेश रैना, उमेश यादव, भुवनेश्वर कुमार.