कोरोना पळवण्यासाठी महिलांची जलाभिषेकाची शक्कल ! गर्दीतच उरकला जलाभिषेक

कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्या गुन्हा दाखल

Huge Crowd of women in Gujarat to anoint the temple to escape the corona
कोरोना पळवण्यासाठी महिलांची जलाभिषेकाची शक्कल ! गर्दीतच उरकला जलाभिषेक

देशातील प्रत्येक राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा शिरकाव झाला आहे. महाराष्ट्रासोबच गुजरात राज्यालाही कोरोनाचा प्रचंड फटका बसला आहे. गुजरातमध्ये रुग्णांसोबतच मृतदेहांचीही अवस्थाही अत्यंत बिकट परिस्थितीत आहे. कोरोनाचा कहर वाढत असताना गुजरातमध्ये मात्र लोक देवाला जलाभिषेक घालण्यासाठी रस्त्यावर उतरले आहेत. गुजरातच्या नवापूरा येथील साणंद गावातील एका मंदिरात भाविकांनी मोठ्या संख्येने देवाला जलाभिषेक घालण्यासाठी मोठी गर्दी केली होती. कोरोनाला पळवून लावण्यासाठी आम्ही देवाला जलभिषेक घालत आहोत असे सांगण्यात आले. या जलाभिषेकामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.  या गर्दीमुळे कोरोनाचे सर्व नियम धाब्यावर बसवून कोरोना गाईडलाईन्सचे उल्लंघन करण्यात आले.

गुजरात नवापूरा साणंद येथे असलेल्या बलियादेवी मंदिराला जलाभिषेक करण्यासाठी महिलांनी प्रंचड गर्दी केली होती. डोक्यावर हंडा कळशी घेऊन महिला रस्त्यावर उतरलेल्या पहायला मिळाल्या. महिलांच्या तोंडावर मास्त नव्हता त्याचप्रमाणे सोशल डिस्टन्सिंगचा पूर्ता फज्जा उडवला होता. गुजरातच्या या देवी मंदिराला  जलाभिषेक घालण्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून पोलिसांकडून तात्काळ  २३ लोकांवर कारवाई करण्यात आली. कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्या गुन्हा देखिल दाखल करण्यात आला आहे.


देशात सातत्याने कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे. देशभरात कोरोना रुग्णांनी जवळपास साडेतीन लाखांचा टप्पा पार केला आहे. महाराष्ट्रापेक्षाही गुजरात राज्यात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत आहे. गुजरातमध्ये सध्या १ लाखांहून अधिक रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत. तर आतापर्यंत एकट्या गुजरातमध्ये ६ लाख २० हजार ४७२ जणांचा मृत्यू झाला आहे.


हेही वाचा – Coronavirus Outbreak: भारतात कोरोनाची तिसरी लाट टाळणे अशक्य, केंद्र सरकारच्या मुख्य वैज्ञानिकांचा इशारा