Eco friendly bappa Competition
घर Uncategorized INX मीडिया केस; पी. चिदंबरम यांना अटकपूर्व जामीन

INX मीडिया केस; पी. चिदंबरम यांना अटकपूर्व जामीन

Subscribe

INX मीडिया प्रकरणामध्ये माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना दिल्ली हायकोर्टाने मोठा दिलासा दिला आहे. त्यामुळे पी. चिदंबरम यांना १ ऑगस्टपर्यंत अटक करता येणार नाही.

आयएनएक्स मीडिया आर्थिक गैरव्यवहार प्रकरणामध्ये माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना दिल्ली हायकोर्टाने दिलासा दिला आहे. पी. चिदंबरम यांना १ ऑगस्टपर्यंत अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे. ६ जुन रोजी सीबीआयने जवळपास ४ तास आयएनएक्स मीडिया डील प्रकरणामध्ये पी. चिदंबरम यांची चौकशी केली होती. त्यानंतर जवळपास महिन्याभरानंतर पी. चिदंबरम यांना दिल्ली हायकोर्टाने जामीन मंजुर केला आहे. आयएनएक्स मीडिया कंपनीच्या व्यवहारामध्ये आर्थिक गैरव्यवहाराचा ठपका झाल्याच्या आरोपामध्ये सध्या सीबीआय पी. चिदंबरम यांची चौकशी करत आहे. आयएनएक्स मीडियामध्ये विदेशी गुंतवणुकीला परवानगी मिळवून देण्यासाठी पी. चिदंबरम यांचा मुलगा कार्ती यांनी लाच घेतल्याचा आरोप आहे. यावेळी पी. चिदंबरम हे केंद्रीय अर्थमंत्री होते. आयएनएक्स मीडिया इंद्राणी आणि पीटर मुखर्जी यांच्या मालकीची कंपनी आहे. सध्या मुलगी शीना बोरा हत्या प्रकरणामध्ये इंद्राणी आणि पीटर मुखर्जी मुंबईतील तुरूंगामध्ये आहेत. आयएनएक्स मीडिया केसप्रकरणामध्ये कार्ती यांना देखील अटक करण्यात आली होती. INX मीडिया प्रकरणामध्ये अटक टाळण्यासाठी पी. चिदंबरम यांनी न्यायालयात दाद मागितली होती. अखेर त्यांना दिल्ली हायकोर्टाने अटकपूर्व जामिन मंजुर केला आहे.

काय आहे आयएनएक्स मीडिया प्रकरण?

१. शीना बोरा हत्या प्रकरणातील आरोपी असलेल्या इंद्राणी मुखर्जी आणि पीटर मुखर्जी यांच्या मालकीची आयएनएक्स मीडिया ही कंपनी आहे. या कंपनीमध्ये एफडीआय अर्थात फॉरेन डायरेक्ट इन्सवेस्टसाठीचा प्रस्ताव एफआयपीबीने स्वीकारला होता. १८ मार्च २०१७ रोजी अर्थमंत्रालयाने ४ कोटी ६४ लाखांच्या गुंतवणुकीला मान्यता दिली होती.

- Advertisement -

२. त्यानंतर आयएनएक्स मीडियाने नियमांचे उल्लंघन केले आणि आयएनएक्स न्यूज या नवीन कंपनीत २६ टक्के गुंतवणूक केली. मात्र परकीय गुंतवणूकदारांना ८०० रूपये दराने समभागांची विक्री केली. परिणामी ४.६४ कोटी रूपयांची परकीय गुंतवणुकीची परवानगी ही ३०५ कोटी रूपयापर्यंत पोहोचली.

३. आयकर खाते आणि महसूल विभागाने या संपूर्ण प्रकरणात आयएनएक्स मीडिया कंपनीला नोटीस पाठवली. पण, कार्ती चिदंबरम यांनी या प्रकरणी हस्तक्षेप करत कंपनीला नव्याने परवानगी मिळवून दिली. त्यावेळी पी. चिदंबरम हे केंद्रीय अर्थमंत्री पदावर होते.

- Advertisement -

४. नव्याने परवानगी मिळवून दिल्याने कार्ती चिदंबरम यांना ३.५० कोटींहून जास्त रक्कम देण्याचा आरोप आहे. याप्रकरणी सीबीआयने २०१७ साली कार्ती चिदंबरम त्यांची कंपनी चेस मॅनेजमेंट, अॅडव्हॉन्टेज स्ट्रॅटेजिक कन्सल्टिंग कंपनीच्या पद्मा विश्वनाथन, पीटर आणि इंद्राणी मुखर्जी यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला.

- Advertisment -