घरUncategorizedजेव्हीएलआर जलवाहिनी फुटलेल्या परिसरात टँकर्समार्फत पाणीपुरवठा

जेव्हीएलआर जलवाहिनी फुटलेल्या परिसरात टँकर्समार्फत पाणीपुरवठा

Subscribe

आज मध्यरात्रीपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत होण्याची शक्यता, मुंबईकरांनी महानगरपालिका प्रशासनाला सहकार्य करावे असं आवाहन केलं आहे.

जेव्हीएलआर येथे हिल क्रिस्ट इमारतीजवळ वेरावली जलाशयाचा भरणा करणारी जलवाहिनी फुटल्‍यानंतर त्‍याठिकाणी दुरुस्‍तीचे काम युद्धपातळीवर सुरु असून वांद्रे, अंधेरी, जोगेश्‍वरी, घाटकोपर (पश्चिम), कुर्ला (पश्चिम) या भागातील बाधित परिसरात नागरिकांना टँकर्सच्‍या एकूण ४७३ फेऱ्यांद्वारे आतापर्यंत पाणीपुरवठा करण्‍यात आला आहे. या जलवाहिनीस झालेल्या नुकसानाची व्याप्ती पाहता आणि त्‍यात येणाऱ्या अडचणी लक्षात घेता दुरुस्तीचे काम १ फेब्रुवारीच्या मध्यरात्रीपर्यंत पूर्ण करण्याचे प्रशासनाचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. त्यामुळे,  नागरिकांनी महानगरपालिका प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन केलं गेलंय.

गुरुवारी सकाळच्या सुमारास जेव्हीएलआर येथे हिल क्रिस्ट इमारतीजवळ मेट्रो – ६ च्या पायलिंगचे काम सुरु असताना वेरावली जलाशयास जोडली गेलेली १८०० मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी फुटली. महानगरपालिकेच्या जल अभियंता विभागामार्फत जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरु करण्यात आले. बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे बाधित परिसरातील नागरिकांना पाणीपुरवठ्याची गैरसोय होऊ नये म्हणून वांद्रे (पश्चिम) येथे भाभा रुग्णालय; सांताक्रुझ (पूर्व) येथे वाकोला गावदेवी टनेल, वाकोला आणि मालाड (पश्चिम) येथे लिबर्टी गार्डन या ठिकाणी पाण्याचे टँकर विनाशुल्‍क भरण्याची व्यवस्था उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

- Advertisement -

४० टँकरने पाण्याची सुविधा – 

महानगरपालिका प्रशासनाकडून एच/पश्चिम विभागात महानगरपालिकेचे १३ आणि खासगी ४७ अशा एकूण ६०; एच/पूर्व विभागात महानगरपालिकेचे २४ आणि खासगी ९३ अशा एकूण ११७; पी/उत्‍तर विभागात महानगरपालिकेचे ७ आणि खासगी १२० असे एकूण १२७; एल विभागात महानगरपालिकेचे ३ आणि खासगी १२६ अशा एकूण १२९; एन विभागात महानगरपालिकेचे २६ तर खासगी १४ अशा एकूण ४० पिण्‍याचे पाण्‍याचे टॅंकर्सच्‍या फेऱ्या करुन पाणी उपलब्‍ध करुन देण्‍यात आले आहे. या सर्व मिळून ४७३ फेऱ्यांमुळे बाधि‍त परिसरांमध्‍ये पाणीपुरवठा करुन नागरिकांना दिलासा देण्‍यात आला आहे.

मध्यरात्रीपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत करणार – 

बाधित क्षेत्र असलेल्या म्हणजेच वांद्रे (पूर्व व पश्चिम), अंधेरी (पूर्व व पश्चिम), जोगेश्वरी (पूर्व व पश्चिम), घाटकोपर (पश्चिम) या भागातील सहाय्यक आयुक्तांना नागरिकांना पाणीपुरवठा करण्याच्या अनुषंगाने सर्वतोपरी मदत आणि सहकार्य करण्याचे तसेच समन्वय साधण्याचे आदेश महानगरपालिका प्रशासनाने दिले आहेत. तसेच मुंबई शहर आणि उपनगरात उपलब्ध असणारे महानगरपालिकेचे,  खासगी पाण्याचे टँकर्स बाधित भागात सेवा देण्यासाठी प्रशासनाने रवाना केले आहेत.

- Advertisement -

महानगरपालिकेची संपूर्ण यंत्रणा आणि वरिष्ठ अधिकारी या कामी कार्यरत असून जलवाहिनी दुरुस्तीचे काम आवश्यक त्या मनुष्यबळास व यंत्रसामुग्रीसह युद्धपातळीवर सुरु आहे. याठिकाणी महानगरपालिकेचे वरिष्‍ठ अधिकारी स्‍वतः उपस्थित असून कामांमध्‍ये समन्‍वय राखण्‍यासह योग्‍य ते निर्देश देत आहेत. दुरुस्तीचे काम आज ०१ फेब्रुवारीच्या मध्यरात्रीपर्यंत पूर्ण करुन पाणीपुरवठा सुरळीत सुरु करण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -