घरUncategorizedस्वच्छता अभियानाला शिक्षण विभागाचा लेटमार्क

स्वच्छता अभियानाला शिक्षण विभागाचा लेटमार्क

Subscribe

अभियानासंदर्भातील परिपत्रक शिक्षण निरीक्षक कार्यालयाकडून चक्क १३ ऑगस्टला काढत शाळा प्रशासनांना तातडीने अभियान राबवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे दोन दिवसांत नियोजन कसे करायचे शिक्षकांसमोर प्रश्न

केंद्र सरकारकडून स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर ‘गंदगी मुक्त अभियान’ सुरू केले आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने ८ ते १५ ऑगस्टदरम्यान शाळास्तरावर स्वच्छता अभियान ही विशेष मोहीमेंतर्गत ऑनलाईन चित्रकला आणि निबंध स्पर्धेचे आयोजन केले आहे. मात्र या अभियानासंदर्भातील परिपत्रक शिक्षण निरीक्षक कार्यालयाकडून चक्क १३ ऑगस्टला काढत शाळा प्रशासनांना तातडीने अभियान राबवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे दोन दिवसांमध्ये विद्यार्थ्यांपर्यंत माहिती पोहचवणे आणि त्यांच्याकडून निबंध आणि चित्र काढून कसे घ्यायचे असा प्रश्न शिक्षकांसमोर निर्माण झाला आहे.

केंद्र सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालय, स्कूल शिक्षा और साक्षरता विभागातर्फे ‘गंदगी मुक्त अभियान’ अंतर्गत ८ ते १५ ऑगस्टदरम्यान स्वच्छता अभियानासाठी विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. या निमित्ताने इयत्ता सहावी ते आठवीसाठी १३ ऑगस्टला ‘गंदगी मुक्त मेरा गाव’ या विषयावर ऑनलाईन चित्रकला तर इयत्ता नववी व दहावीसाठी ऑनलाईन निबंध स्पर्धा घेण्याचे परिपत्रक शिक्षण निरीक्षक कार्यालयाकडून काढण्यात आले आहे. निबंध स्पर्धा ही मराठी, इंग्रजी भाषेतून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ही स्पर्धा ८ ते १५ ऑगस्टदरम्यान घेण्याच्या सूचना केंद्र सरकारकडून राज्य सरकारला दिल्या असल्या तरी शिक्षण निरीक्षक कार्यालयाकडून यासंदर्भातील परिपत्रक १३ ऑगस्टला शाळांना पाठवण्यात आले आहे. तसेच मराठी, हिंदी व इंग्रजी माध्यमातून सहभागी होणार्‍या विद्यार्थ्यांमधून प्रत्येकी तीन क्रमांक काढून चित्र व निबंध शिक्षण निरीक्षक कार्यालयाला १९ ऑगस्टपर्यंत पाठवायचे आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना स्पर्धेसाठी तयार करणे, स्पर्धेचे नियोजन करणे, स्पर्धा घेणे आणि निकाल लावणे ही तारेवरची कसरत करण्यासाठी शाळांना फक्त दोन दिवस मिळाले आहेत. त्यामुळे कोरोना काळात दोन दिवसांत ही स्पर्धा कशी घ्यायची असा प्रश्न शिक्षकांसमोर निर्माण झाला आहे.

- Advertisement -

दरवर्षी शेवटच्या क्षणाला मिळते परिपत्रक

केंद्र सरकारकडून दरवर्षी स्वातंत्र्यदिनानिमित्त विशेष अभियान राबवण्यात येते. त्याची माहिती शाळास्तरावर शेवटच्या क्षणाला पोहचत असल्याचे कार्यक्रम करण्यासाठी शिक्षक व शाळा प्रशासनांला तारेवरची कसरत करावी लागते. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन स्पर्धा आयोजित करणे सहज शक्य होते. परंतु नियोजन करुन पत्र पाठवले असते तर वेळेवर काम करता आले असते. निदान या पुढे शिक्षण विभागाने परिपत्रक वेळेवर पाठवणे आवश्यक असल्याची अपेक्षा शिक्षकांकडून व्यक्त करण्यात आली.

- Advertisement -

पत्रक मराठी स्पर्धेचा विषय हिंदी

शिक्षण निरीक्षक कार्यालयाकडून काढण्यात आलेल्या परिपत्रकामध्ये निंबध स्पर्धा ही मराठी व इंग्रजीमधून घेण्याचे निर्देश दिले असताना पत्रकामध्ये विषय ‘गंदगी मुक्त मेरा गाँव’ असे हिंदीतून दिल्याबद्दल शिक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे. विषय मराठीतून देणे गरजेचे असल्याचे मत शिक्षकांकडून वर्तवण्यात येत आहे.

गंदगी मुक्त अभियान ८ ते १५ आँगस्टपर्यत राबवण्यासाठी शिक्षण विभागाने काढलेल्या १३ आँगस्ट पत्राची दखल शाळा ने कशी घ्यायची असा प्रश्न शाळांमध्ये पडला आहे. पत्रक मराठीमध्ये व विषय हिंदीमधून देताना साधारण बदल अपेक्षित होते.
– उदय नरे, शिक्षक, हंसराज मोरारजी पब्लिक स्कूल, अंधेरी
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -