घर Uncategorized अंधेरीत भर रस्त्यात खून

अंधेरीत भर रस्त्यात खून

Subscribe

चार महिन्यानंतर मुंबईत आलेल्या खानने अवघ्या चारच दिवसात असा भयानक प्रकार केला. सकाळी वायएमसी शाळेजवळ त्याने अभिषेकला अडवले

अंधेरीत शनिवारी सकाळी भर रस्त्यात एका तरुणाचा खून झाला. अंधेरीच्या डी. एन. नगर भागात हा प्रकार घडला असून एका माथेफिरुने चाकू भोसकून हत्या केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या भागात भीतीचे वातावरण पसरले आहे. अभिषेक शुक्ला असे मृत तरुणाचे नाव असून अली असगर खान (३०) या माथेफिरुने रस्त्यात चाकू भोसकून अभिषेकचा खून केला.

खुनी काहीच दिवसांपूर्वी आला मुंबईत

अभिषेकचा खून करणारा अली असगर खान हा चारच दिवसांपूर्वी धर्मपठणाचे धडे घेऊन मुंबईत आला होता. धर्मविधी,त्यातली पथ्ये याची खानला जाणीव व्हावी, यासाठी वडिलांनी त्याला सहा महिन्यांसाठी आसामला पाठवले होते. पण चार महिन्यानंतर मुंबईत आलेल्या खानने अवघ्या चारच दिवसात असा भयानक प्रकार केला. सकाळी वायएमसी शाळेजवळ त्याने अभिषेकला अडवले.त्याच्या हातातली बॅग मागितली. पण त्यांने बॅग दिली नाही म्हणून त्याने अभिषेकला चाकू भोसकला. यात गंभीर जखमी झालेल्या अभिषेकला कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

चोरीच्या उद्देशाने खून

- Advertisement -

अभिषेक शुक्ला मूळचा मध्यप्रदेशचा रहिवासी असून वित्त, बॅंकविषयक अभ्यासाठी मुंबईत आला होता. हा खून चोरीच्या उद्देशाने झाल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. तरी पोलीस अधिक तपास करत आहेत दरम्यान, आरोपी अली असगर सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -