घरUncategorizedसामाजिक संस्थांचा पर्यावरण जाहीरनामा सादर

सामाजिक संस्थांचा पर्यावरण जाहीरनामा सादर

Subscribe

विविध मुद्दे असलेला पर्यावरण रक्षणाचा जाहीरनामा सोमवारी (दि. २२) सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींनी जाहीर केला.

गोदावरी गटार मुक्त करा, जुन्या जलस्त्रोतांचे संवर्धन करा. रेनवॉटर हार्वेस्टिंगची प्रभावी अंमलबजावणी करा. वृक्षारोपण करा व त्यांचे जतन करा. डोंगराच्या पायथ्याशी होत असलेला खनिज उपसा थांबवा, असे विविध मुद्दे असलेला पर्यावरण रक्षणाचा जाहीरनामा सोमवारी (दि. २२) सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींनी जाहीर केला. लोकसभा निवडणुकीसाठी उभ्या असलेल्या सर्व उमेदवारांना प्रत्यक्ष भेटून हा जाहीरनामा देणार असल्याचेही या प्रतिनिधींनी यावेळी सांगितले. जाहीरनामा उपक्रमात गोदावरी गटारीकरण विरोधी मंच, मानव उत्थान मंच, निसर्ग विज्ञान संस्था, प्राणिमित्र संघटना, शरण प्राणिमित्र संघटना, महर्षी चित्रपट संस्था, गीव्ह सामाजिक संस्था, कपिला नदी बचाव समिती, सक्षम सोशल फाउंडेशन, निसर्ग सेवक युवा मंच, केदारनाथ बहुउद्देशीय संस्था या १६ संस्था सहभागी झाल्या.

सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी म्हणून निशिकांत पगारे, जगबिर सिंग, प्रा. सोमनाथ मुठाळ, राम खुर्दळ, शेखर गायकवाड, भारती जाधव, शरण्या शेट्टी, सुनंदा जाधव, चंद्रकिरण सोनवणे, रमेश अय्यर, नितीन शुक्ला, योगेश बर्वे, सुनील परदेशी, अमित कुलकर्णी, विनोद संसारे, कचरू वैद्य यावेळी उपस्थित होते.

असा आहे पर्यावरण जाहीरनामा

  • गोदावरी व गोदावरी नदीस मिळणार्‍या उपनद्या ह्या ‘गटारमुक्त, प्रदुषणमुक्त, अतिक्रमण मुक्त व काँक्रीटमुक्त झाल्या पाहिजेत.
  • भुजल पातळी सुधारण्यासाठी नैसर्गिक विहिरी व जलस्त्रोत यांचे संवर्धन व पुनर्भरण झाले पाहिजे.
  • विंधन विहिरी खोलीसाठी मर्यादा घातली पाहिजे.
  • रेनवॉटर हार्वेस्टिंगची प्रभावी व कठोर अंमलबजावणी करावी.
  • वृक्षारोपण झाल्यानंतर त्याचे संगोपन करुन शहरात ऑक्सिजन पार्क उभारावेत.
  • वृक्षांचे दरवर्षी ऑडीट झालेच पाहिजे.
  • गडकिल्ल्यांचे संवर्धन व संगोपन झाले पाहिजे.
  • सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत सीएनजी चा वापर करा.
  • वायू गुणवत्ता निर्देशांक जास्तीत जास्त ५० असावा. तो आता जवळपास १२० आहे.
  • प्राणी क्रुरता संरक्षण समिती सक्षम करावी.
  • प्लॅस्टिक बंदीची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी.
  • पर्यावरणपूरक अंत्यसंस्कार यंत्रणेचा वापर करावा.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -