घरUncategorizedमहापौरांविरोधात मनसे आक्रमक; राजीनाम्याची मागणी

महापौरांविरोधात मनसे आक्रमक; राजीनाम्याची मागणी

Subscribe

माय-लेकाचा बळी जाण्याच्या दुर्घटनेनंतर निषेध करणाऱ्या महिलांचा अवमान करणाऱ्या तसेच त्यांना धमकी देणाऱ्या महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्यावर कठोर कारवाईची मागणी

सांताक्रूझ पटेल नगरमध्ये महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी एका महिलेचा हात पिरगळल्याचा व्हीडिओ व्हायरल झाल्यानंतर त्याचा जाब विचारण्यासाठी मनसेच्या कार्यकर्त्यांनी महापौर बंगल्यावर धडक दिली. अजूनही मनसेच्या महिला कार्यकर्त्या महापौर यांच्या बंगल्याबाहेर जमून महापौर भेट देतील यासाठी वाट पाहत आहेत.

वारंवार बेताल वक्तव्य करणाऱ्या आणि महिलांशी असभ्य वर्तन करणार्‍या महापौरांनी वर्तनात सुधारणा करावी, असे निवेदन मनसे कार्यकर्त्यांकडून महापौरांना देण्यात येणार आहे. पण, अनेक तासांपासून महापौर बंगल्याच्या प्रवेशद्वारावर उभे असून साधे निवेदन स्विकारण्यासाठीही भेट मिळत नसल्याने मनसे शाखा अध्यक्ष किरण टाकळे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

- Advertisement -

मुंबईतील पाणी तोडण्याच्या समस्येचे सोबतच विविध घटनांवर महापौरांकडून बेताल वक्तव्य सुरू आहेत. त्यानंतर सांताक्रुझ येथील महिलेशी असभ्य वर्तन मुंबई महानगरपालिकेला काळीमा फासणारी आहे. एकंदरीतच मुंबईचे प्रथम नागरिक असलेले महापौरच जर असे वर्तन करत असतील, तर निश्चितच उभ्या मुंबईसाठी ही लाजिरवाणी बाब आहे. म्हणूनच, मुंबई आणि महानगरपालिकेची प्रतिमा सुधारण्यासाठी महापौरांनी वर्तनात सुधारणा करावी, असे निवेदन देण्यासाठी मनसेने महापौरांच्या निवासस्थानाबाहेर मोर्चा काढला आहे. तसंच, ज्यावेळेला महिलेचा अवमान केला त्यावेळी उपस्थित असणाऱ्या पोलिसांवरही कारवाई करावी अशी मागणी मनसेने पोलीस उपायुक्तांकडे केली आहे.

सांताक्रूज- वाकोला येथील पटेल नगरातील माय-लेकाचा बळी जाण्याच्या दुर्घटनेनंतर निषेध करणाऱ्या महिलांचा अवमान करणाऱ्या तसेच त्यांना धमकी देणाऱ्या महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्यावर कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे आणि मनसेच्या शिष्टमंडळाने पोलीस उपायुक्त मंजुनाथ शिंगे यांची भेट घेत त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी करत निवेदन दिले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -