रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास उपयुक्त मोरिंगा आणि आवळा

शरीराला निरोगी ठेवण्यासाठी किंवा कोणत्याही अजरापासून आपले संरक्षण करण्यासाठी शरीराच्या रोगप्रतिकारशक्तीचे अत्यधिक महत्व आहे. कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावमुळे सध्या प्रत्येक व्यक्ती आपली रोगप्रतिकार शक्ती मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहेत. आज तुम्हाला शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी एक असा उपाय सांगणार आहोत ज्यामुळे हमखास तुमच्या रोगप्रतिकारशक्तीत वाढ होऊ शकते. आरोग्य विशेषज्ञाच्या माहिती नुसार आवळा आणि मोरिंगा (शेवग्याच्या झाडाची पानं) यापासून बनवण्यात आलेलं ज्यूस हे रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यास अत्यंत उपयुक्त आहे. सर्वात आधी आपण या दोघांमधील गुणधर्म आणि फायदे जाणून घेऊया.

जाणून घ्या फायदे-

मोरिंगा (शेवग्याच्या झाडाची पानं) फायदे –

शेवग्याच्या झाडाच्या फुलाचा, शेंगाचा, सालीचा तसेच पानांचा आपल्या शरीसाठी अनेक उपयुक्त असे फायदे आहेत. त्यातील महत्वाचा फायदा म्हणजे रोगप्रतिकारशक्ती वाढवणे होय. मोरिंगामध्ये अँटीफंगल, अँटीइंफ्लामेट्रि गुण आढळतात ज्यामुळे इन्फेक्शन आणि शरीराला सूज आल्यास ती कमी करण्यास मदत करते. तसेच मोरिंगामध्ये भरपूर प्रमाणात ‘विटामीन क’चे गुणधर्म असतात जे रोगप्रतिकारशक्ती वाढवते. तसेच रक्तदाब, डायबेटीज, हृदयरोग सारख्या अजरापासून बचाव करण्यासाठी मोरिंगा अत्यंत लाभकरी आहे. शरीराच्या आरोग्य बरोबरच आपल्या चेहर्‍याचे सौंदर्य वाढवण्यासाठी सुद्धा मोरिंगाचा उपयोग होतो.

आवळ्याचे फायदे –

आवळ्याचे फायदे आपल्याला तर आधी पासूनच ठाऊक आहेत. आयुर्वेदात आवळ्याच्या मुख्य वापर हा त्रिफळा चूर्णात आणि च्यवनप्राशात केला जातो. अवळ्या मध्ये विटामीन क ची सर्वाधिक मात्र आढळून येते जे रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत करते. आपल्या शरीरात असणार्‍या पांढर्‍या रक्त पेशींना वाढवण्यास आवळा उपयुक्त आहे.

आवळा आणि मोरिंगा ज्यूस साहित्य

  • अर्धा चमचा मोरिंगा पावडर किंवा पाने
  • एका अवळ्याचा रस
  • १ ग्लास पाणी
कृती 

मोरिंगा पावडर किंवा पाने आणि आवळ्याच्या रस एकत्र करून घ्या. यात पाणी टाकून मिश्रण मिक्सर मध्ये एकजीव करा. यानंतर एका ग्लासमधे सर्व करा. तुम्ही हे हेल्दि ज्यूस दररोज सकाळी पिऊ शकता. यामुळे तुमच्या शरीराच्या रोगप्रतिकार शक्तीत लक्षणीय वाढ होऊ शकते.