घरUncategorizedहवेतच जेट एअरवेजच्या प्रवाशांना इजा! नक्की घडलं काय?

हवेतच जेट एअरवेजच्या प्रवाशांना इजा! नक्की घडलं काय?

Subscribe

आज सकाळी मुंबईहून जयपूरला जाणाऱ्या जेट एअरवेजच्या विमानात प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने एक गंभीर प्रकार घडला. त्यानंतर याची जोरदार चर्चा सुरु आहे. ‘प्रथमदर्शनी हा क्रू मेंबरचा निष्काळजीपणा असल्याचे सांगत विमान उड्डाण घेत असताना विमानातील हवेचा दाब नियंत्रित न केल्यामुळे ऑक्सिजन मास्क खुले झाले’, असे नागरी विमान वाहतूक संचालनालयातर्फे ((DGCA – Directorate General of Civil Aviation) सांगण्यात आले. तसेच विमान अपघात तपास खात्याकडून (AAIB – Aircraft Accident Investigation Bureau) जोपर्यंत या प्रकाराचा तपास होत नाही तोपर्यंत कॉकपिट क्रू मेंबरना सुट्टीवर पाठवण्यात आले आहे.

सदर प्रकरणावर जेट एअरवेजचा खुलासा

- Advertisement -

 

या घटनेची नेमकी सत्यता तपासाअंती समोर येईलच. mymahanagar.com ने काही खासगी विमान वाहतूक कंपन्यांच्या क्रू मेंबरशी या प्रकरणाविषयी बातचित केली, तेव्हा त्यांनी याबाबत खुलासा करताना सांगितले की, ‘ब्लीड स्विच’ हा शब्द बातम्यांमध्ये वापरला जात असला तरी अशा प्रकारचा कोणताही स्विच विमानात नसतो. मुळात समुद्रसपाटीपासून १४ हजार फूट उंचीवर गेल्यानंतर केबिनमधील प्रेशर वाढल्यास हवेचा दाब निर्माण होतो. त्यानंतर आपोआपच प्रवाशांच्या डोक्यावरील ऑक्सिजन मास्क खाली येतात. आता डिकम्प्रेशन म्हणजेच हवेचा दाब अनियंत्रित होण्यामागे अनेक कारणे असू शकतात.

विमानात हवेचा दाब कमी झाल्यास काय होते?

विमानाचा प्रवास सुरु होण्याआधी तुम्ही विमानात सुरक्षेच्या दृष्टीने काही उपाय सांगणारी घोषणा ऐकली असेल. “विमानातील हवेचा दाब कमी झाल्यास ऑक्सिजन मास्क खाली येईल, तो नाक आणि तोंडावर लावावा.” २० मिनिटांत विमान ३० हजार फुटांचा टप्पा पार करते. ज्यामध्ये कधीकधी अचानक विमानातील हवेचा दाब वाढतो. ७ हजार फुटांवर जेव्हा विमान पोहोचते, तेव्हाच तुम्हाला हवेचा दाब जाणवू लागतो. विशेषत: कानामध्ये हवेचा दाब जास्त जाणवतो. जोपर्यंत प्रवाशांना श्वास घेण्यास अडचण येत नाही तोपर्यंत हा हवेचा दाब लक्षातही येत नाही.

- Advertisement -

…म्हणून वाढतो हवेचा दाब

विमानाच्या बाह्यकवचाला किंवा खिडकीला जर एखादा तडा गेला असेल, दरवाजा व्यवस्थित बंद झाला नसेल तर विमान एखाद्या विशिष्ट उंचीवर जात असताना आत हवेचा दाब तयार होतो.

दाब निर्माण झाल्यानंतर काय करावे?

हवेचा दाब निर्माण होणे ही धिम्या गतीने होणारी प्रक्रिया आहे. यातून मार्ग काढायचा असल्यास विमान जवळच्या विमानतळावर उतरवण्याखेरीज दुसरा मार्ग नसतो. हवेचा दाब अनियंत्रित होणे किंवा नियंत्रित करणे यापैकी कोणतीही गोष्ट तांत्रिकदृष्ट्या केबिन क्रू मेंबरला करता येत नाही, असा दावा एका खासगी विमानकंपनीच्या क्रू मेंबरकडून करण्यात आला आहे.


हे देखील वाचा – प्रवाशांच्या नाक-कानातून रक्तस्त्राव; जेट एअरवेजचे इमर्जन्सी लँडिंग

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -