घर Uncategorized मुंब्रा येथील विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला

मुंब्रा येथील विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला

Subscribe

या शाळांमध्ये १२ हजार विद्यार्थी शिक्षण घेत असून धोकादायक इमारतींमुळे त्यांचा जीव टांगणीला लागला आहे.

ठाणे महापालिका परिक्षेत्रातील शाळांच्या दुरावस्थेबाबत प्रशासनाने १३४  शाळांच्या ८५ इमारतींचे सर्वेक्षण पूर्ण केले असून यात २९  शाळा या २५ ते ३० वर्षे जुन्या असल्याने त्यांच्या सर्वांगीण दुरुस्तीची गरज असल्याचा अहवाल सार्वजनिक बांधकाम विभागाने शिक्षण विभागाकडे दिला आहे. या शाळांमध्ये १२ हजार विद्यार्थी शिक्षण घेत असून धोकादायक इमारतींमुळे त्यांचा जीव टांगणीला लागला आहे.

शाळेमध्ये सुमारे ५०० विद्यार्थी

ठाणे महानगर पालिकेने याबाबत कारवाई करित मुंब्य्रातील देवीपाडा नदीम अपार्टमेंट या इमारतीमधील तळमजल्यावर सुरू असलेल्या शाळेला नोटीस लावून सील केले. मात्र संस्थाचालकाने ही शाळा तेथून पुढे असलेल्या एका निवासी इमारतीमधील तळमजल्यावर सुरू केली आहे. मुंब्रा स्टेशनजवळील देवीपाडा परिसरामधील नदीम अपार्टमेंट या ठिकाणी सनशाईन कॉन्व्हेन्ट इंग्लीश हायस्कूल सुरू आहे. चार वर्ग असलेल्या या शाळेमध्ये सुमारे ५०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. के.जी.पासून ते १० वीपर्यंतचे वर्ग असलेल्या या शाळेची इमारत ठाणे महानगर पालिकेने अतिधोकादायक म्हणून घोषित केली आहे. मागील दोन वर्षापासून ही इमारत धोकादायक म्हणून घोषित करण्यात आली असून या वर्षी कोणतीही दुर्घटना घडू नये म्हणून ठामपाने या शाळेला मागील आठवड्यात सील केले.

शिक्षण मंडळाचे सर्व नियम धाब्यावर

- Advertisement -

मात्र संस्थाचालकाने शिक्षण मंडळाचे सर्व नियम धाब्यावर बसवून भोला को-ऑप हौ.सोसायटी या निवासी इमारतीच्या बेसमेंटमध्ये ही शाळा सुरु केली आहे. या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या कोणत्याही सोयी-सुविधा नाहीत. ज्या ठिकाणी पुर्व पार्कींग आणि दुकानांची व्यवस्था होती. त्या ठिकाणी आता शाळा सुरु आहे. इथला बहुसंख्य पालकवर्ग हा अशिक्षीत असल्यामुळे त्याचा फायदा बेकायदा शाळा चालवणारे घेत आहेत.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -