घरUncategorizedट्रेडमार्कसाठी किटकॅटला कोर्टात 'नो ब्रेक'

ट्रेडमार्कसाठी किटकॅटला कोर्टात ‘नो ब्रेक’

Subscribe

किटकॅटच्या जाहिरातीसाठी आतापर्यंत नेस्लेने कोट्यवधी रुपये खर्च केले आहेत. साधारण २७ ते ९९ कोटी इतकी रक्कम त्यांनी जाहिरातीसाठी खर्च केली आहे.

हॅव अ ब्रेक??… हॅव अ किटकॅट ही किटकॅटची जाहिरात पाहत अनेकांनी अगदी जाहिरातीत दाखवल्याप्रमाणे किटकॅट खाल्ले असेल. कारण किटकॅट खाण्याची एक खास पद्धत आहे. वेफर बिस्कीट चॉकलेटमधला कुरकुरीत प्रकार मात्र सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. कारण कोर्टात किटकॅटच्या या डीझाईनच्या ट्रेडमार्कला ‘नो ब्रेक’ मिळाला आहे.

नेमकं प्रकरण काय?

नेस्लेने किटकॅट चॉकलेच्या फोर फिंगर बारच्या डीझाईनला ट्रेड मार्क मिळावे, यासाठी गेल्या १० वर्षांपासून युरोपीयन कोर्टात लढत आहे. नेस्लेने ही डीझाईन आमची असून त्याला ट्रेडमार्क द्यावे अशी मागणी लावून धरली होती. पण या आधीही नेस्लेला ट्रेडमार्क मिळाले नव्हते. आणि आता नेस्लेची ही याचिका युरोपीयन कोर्टाने फेटाळली आहे.

- Advertisement -

कोर्ट नेमकं काय म्हणाले

कोर्टाने या याचिकेवर सुनावणी करताना नेस्लेला ट्रेडमार्क मिळवण्यासाठी किटकॅट प्रत्येक युरोपीयन देशात नावाजलेले असणं गरजेचे आहे. कोर्टाच्या हाती आलेल्या माहितीनुसार किटकॅट केवळ डेन्मार्क, जर्मनी, स्पेन, फ्रान्स, इटली, नेदरलँड, ऑस्ट्रिया, फिन्लँड, स्वीडन, आणि युके मध्ये लोकांना माहित आहे. पण बेल्जियम, आर्यलँड, ग्रीस आणि पोर्तुगालमध्ये या चॉकलेटची माहिती कोणाला नाही. त्यामुळे नेस्ले फोर बार फिंगरवर कोणताही अधिकार दाखवू शकत नाही.

आतापर्यंत केले ९९ कोटी खर्च

किटकॅटच्या जाहिरातीसाठी आतापर्यंत नेस्लेने कोट्यवधी रुपये खर्च केले आहेत. साधारण २७ ते ९९ कोटी इतकी रक्कम त्यांनी जाहिरातीसाठी खर्च केली आहे. ब्रिटनमध्ये २०१० साली तब्बल ३० कोटी किटकॅटची विक्री केली आहे, असे असूनही किटकॅटला ट्रेडमार्क मात्र मिळत नाही.

- Advertisement -

(सौजन्य- युट्युब)

किटकॅटच्या आकाराची अन्य चॉकलेट

किटकॅटसारखे मोन्डेलाज कंपनीचे मिल्का नावाचे चॉकलेट आहे. याशिवाय kvikk lunsj नावाचे चॉकलेट देखील आहे. १९३७ साली हे चॉकलेट बाजारात आले तर त्याआधी किटकॅट १९३५ साली बाजारात आले. ज्याचे नाव आधी रॉन्ट्री चॉकलेट क्रिस्प असे होते. जे हिट झाले होते. नेस्लेने फिंगर बारसाठी याचिका दाखल करेपर्यंत ही दोन्ही चॉकलेट बाजारात होते आणि त्यांचा चाहता वर्ग वेगळा होता. २००२ साली किटकॅटने ट्रेडमार्कसाठी ग्लोबल ट्रेडमार्ककडे अर्ज केला. ट्रेडमार्क देण्यासंदर्भात काहीच अडचणी नसल्याचे ग्लोबल ट्रेडमार्कडून सांगण्यात आले. कारण त्यावर किटकॅटचा लोगो होता. पण किटकॅट त्याच्या फोर फिंगर वेफर आणि आकाराला ट्रेडमार्क मिळण्यावर अडून राहिल्यामुळे त्यांनी कोर्टात याचिका दाखल केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -