घरUncategorizedगणेशोत्सव काळात थर्माकोल वापरास बंदी - उच्च न्यायालय

गणेशोत्सव काळात थर्माकोल वापरास बंदी – उच्च न्यायालय

Subscribe

गणेशोत्सव काळात थर्माकोलच्या वापरावर उच्च न्यायालयाने बंदी घातली आहे. शिवाय, सजावटीसाठी थर्माकोल वापरायचा असेल तर तसे लेखी आश्वासन द्यावे लागणार आहे.

राज्यात २३ जून पासून प्लॅस्टिक बंदी लागू करण्यात आल्यानंतर आता थर्माकोल वापरण्यास देखील बंदी घालण्यात आली आहे. गणेशोत्सव काळात मोठ्या प्रमाणात थर्माकोलचा वापर केला जातो. सजावटीसाठी थर्माकोल वापरल्यानंतर त्याची विल्हेवाट लावणे कठीण काम.त्यामुळे गणेशोत्सव काळात थर्माकोल वापरण्यावर उच्च न्यायालयाने आता बंदी घातली आहे. परिणामी तोंडावर आलेल्या गणेशोत्सव काळात सजावटीसाठी थर्माकोलचा वापर करता येणार नाही. त्यामुळे थर्माकोल उत्पादकांसह गणेशमंडळांसमोर देखील न्यायालयाच्या या निर्णयामुळे मोठा प्रश्न उभा राहिला आहे. सजावटीसाठी थर्माकोलचा वापर करायचा असल्यास मंडळांना लेखी आश्वासन देणे बंधनकारक असेल. ज्यामध्ये थर्माकोलचा पुर्नवापर केला जाईल किंवा वापरल्यानंतर त्याची काळजीपूर्वक विल्हेवाट लावली जाईल असा उल्लेख असेल. उच्च न्यायालयाच्या या आदेशाने गणेशोत्सव मंडळांसह थर्माकोल उत्पादकांमध्ये देखील आता संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. थर्माकोल नसेल तर सजावट तरी कशी करायची असा प्रश्न आता गणेशोत्सव मंडळांना पडला आहे. गणेशोत्सवादरम्यान थर्माकोलचा वापर करू द्यावा अशी याचिका थर्मोकोल फॅब्रिकेटर अॅण्ड डेकोरेटर असोसिएशन यांच्यावतीने मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली होती. त्यावर न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती रियाझ छागला यांच्या खंडपीठासमोर सुनाणी पार पडली.

थर्माकोल घातकच!

कोणत्याही कार्यक्रमासाठी सजावट करताना थर्माकोलचा वापर हा आलाच. पण, वापरानंतर थर्माकोलची काळजीपूर्व विल्हेवाट लावली जात नाही. शिवाय, थर्मालोकचे विघटन होत नसल्याचे निर्सगासाठी देखील थर्माकोल हानीकारकच! नदी, नाल्यांमध्ये थर्माकोल फेकल्याने जलचर प्राण्यांना देखील त्याचा फटका बसतो. गणेशोत्सव काळात थर्माकोलचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. पण, त्याची विल्हेवाट लावताना मात्र त्याकडे दुर्लक्ष केले जाते. त्याचा परिणाम हा निर्सगावर होतो. गणेशोत्सवासाठी थर्माकोलची खरेदी काही महिन्यांपूर्वी आगोदरच केली जाते. थर्माकोल वापराच्या बंदीमुळे मोठे नुकसान होत असल्याने यावर्षी गणेशोत्सवासाठी थर्माकोल वापराची मुभा द्यावी. अशी याचिका थर्माकोल फॅब्रिकेटर अॅण्ड डेकोरेटर असोसिएशनने दाखल केली होती. यावर निर्णय देताना न्यायालयाने याचिका फेटाळून लावली.

- Advertisement -

न्यायालयाच्या या निर्णयामुळे आता थर्माकोलचा वापर करताना काळजी घेणे गरजेचे आहे. शिवाय, गणेशोत्सवासाठी थर्माकोल वापरत असाल तर न्यायालयाच्या आदेशांचे पालन करणे देखील तितकेच गरजेचे आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -