घरUncategorizedमरीन ड्राइव्हला उडवला कंदील, अन् झाली अटक

मरीन ड्राइव्हला उडवला कंदील, अन् झाली अटक

Subscribe

मरीन ड्राइव्हवर एका व्यक्तीने कंदील उडवल्यामुळे त्याला अटक करण्यात आली आहे.

मरीन ड्राइव्ह हा समुद्र किनारा अनेकांना आपल्याकडे आकर्षित करतो. रात्रीच्या वेळेस अनेकजण समुद्र किनारी गम्मत म्हणून आकाशात कंदील सोडताना दिसतात. मात्र, ही गम्मत एका व्यक्तीला चांगलीच महागात पडली आहे. मुंबईच्या मरीन ड्राईव्हवर कंदील उडवून पोलिसांच्या आदेशाचा भंग केल्याच्या आरोपाखाली ३९ वर्षीय व्यक्तीला अटक करण्यात आली होती. त्या व्यक्तीची आता न्यायालयाने अडीज वर्षानंतर निर्दोष मुक्तता केली आहे. चिनी कंदील, जे मोठ्याप्रमाणावर मरीन ड्राईव्हवर विकले जायचे. त्यामुळे प्रदुषण देखील वाढत होते आणि त्यांना आगीचा धोका असल्याचे समजल्यानंतर त्यावर बंदी घालण्यात आली होती.

३१ ऑक्टोबरला रात्री ११.३० च्या सुमारास दोन हावालदार गस्तीवरील ड्युटीदरम्यान एक व्यक्ती कंदील उडवताना त्यांना आढळला. त्यानंतर पोलिसांनी सांगितले की, कायद्यानुसार घालण्यात आलेल्या बंदीबद्दल आरोपी दनिश याला माहिती दिली, परंतु त्याने त्याकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे त्याला पोलिस ठाण्यात नेले आणि त्याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. दनिशने  कोर्टात सुनावणीच्या दरम्यान कंदील उडवत असल्याचे नाकारले आणि दावा केला की, असा आदेश अस्तित्त्वात आहे हे त्याला माहित नाही.

कायद्याची अंमलबजावणी करणे गरजेचे

त्यानंतर साक्षीदारांची बाजू ऐकून कोर्टाने सांगितले की, ऑर्डरची तारीख व त्याची अंमलबजावणी योग्य रीतीने करण्यात आली नव्हती. तसेच कोर्टाने निर्देशनास आणून दिले की हा आदेश रेकॉर्डवर ठेवण्यात आला नव्हता. तसेच एखाद्या कायद्याची योग्यपद्धतीने अंमलबजावणी करून सामान्य लोकांना कळविने गरजेचे आहे असेही कोर्टाने सांगितले. त्यानंतर दनिशची सुटका करण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -