घरUncategorizedरसेल दिब्रिटो मुंबई संघात

रसेल दिब्रिटो मुंबई संघात

Subscribe

‘महाराष्ट्र श्री’ शरीरसौष्ठव स्पर्धेसाठी संघ जाहीर

सातार्‍याला होणार्‍या ‘महाराष्ट्र श्री’ शरीरसौष्ठव स्पर्धेसाठी मुंबई आणि मुंबई उपनगरचे संघ जाहीर झाले. यंदाची ‘मुंबई श्री’ स्पर्धा जिंकणार्‍या रसेल दिब्रिटोचा मुंबईच्या संघात समावेश करण्यात आले आहे. मागील वर्षीचा ‘मुंबई श्री’ अनिल बिलावा, तसेच सुशील मुरकर, दीपक तांबिटकर यांनाही या संघात स्थान मिळाले आहे. दुसरीकडे मुंबई उपनगरच्या संघात निलेश कोळेकर, नितीन शिगवण यांची निवड करण्यात आली आहे. सातार्‍याच्या तालीम संघाच्या मैदानावर ६ आणि ७ मार्चला होणार्‍या या स्पर्धेतील कामगिरीच्या आधारे राष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघाची निवड करण्यात येईल.

संघ –

मुंबई : पुरुष- अनिल बिलावा, दीपक तांबिटकर, ओंकार आंबोकर, आशिष लोखंडे, सुशील मुरकर, अरुण नेवरेकर, सुजल पिळणकर, निलेश दगडे, उबेद पटेल, अर्जुन कोंचीकोरवे, संतोष भरणकर, सुशांत रांजणकर. महिला फिजिक स्पोर्ट्स – दीपाली ओगले, निशरीन पारीख, वीणा चौहान. महिला शरीरसौष्ठव- अमला ब्रह्मचारी, रिया कुमार.

- Advertisement -

मुंबई उपनगर : पुरुष- निलेश कोळेकर, नितीन शिगवण, देवचंद गावडे, प्रितेश गमरे, उमेश गुप्ता, तेजस भालेकर, मनोज मोरे, भास्कर कांबळे, सुजित महापात्रा, गणेश पेडामकर, नितीन कोळी. महिला फिजिक स्पोर्ट्स- रेणुका मुदलियार, डॉ. मंजिरी भावसार, सिद्धी ठाकूर. महिला शरीरसौष्ठव- डॉ. माया राठोड, श्रद्धा ढोके.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -