घरUncategorizedमराठ्यांचा शूर सेनापतीस त्रिवार वंदन 

मराठ्यांचा शूर सेनापतीस त्रिवार वंदन 

Subscribe

२७ जुलै १७०८ या दिवशी मराठ्यांचे सेनापती धनाजी जाधव यांचे निधन झाले. औरंगझेब महाराष्ट्रातील किल्ले घेण्यात गुंतला होता. तेव्हा धनाजी यांनी आपली बायकामुले वाघिणगिरे येथे आणून ठेवली. इ. स. १७०५-०७ च्या सुमारास औरंगझेबाने तेथील गढीस वेढा दिला, तेव्हा धनाजी मोगलांच्या सैन्याभोवती घिरटया घालून त्यांना त्रास देत होता. धनाजी मोंगलांच्या शिपायांस इतका धाक बसला होता  की ते आलेले दृष्‍टीस पडताच पळावयास लागत. यानंतर मोगलांच्या छावणींतून शाहू महाराजांची सुटका करून धनाजी महाराष्ट्रात आले, पुढे धनाजी जाधव हे शाहू महाराज यांच्या सोबत राहिले.

२७ जुलै १७०८ या दिवशी मराठ्यांचे सेनापती धनाजी जाधव यांचे निधन झाले. लुखजी जाधव याचे पुत्र अचलोजी यांना निजामशहाने ठार मारल्यावर त्याचा मुलगा संताजी याचे संगोपन जिजाबाईने केले. कनकगिरीच्या लढाईत त्यांचा मृत्यू झाला. त्यांना शंभुसिंग म्हणून पुत्र होता. त्यांचा मुलगा धनाजी जाधव हे होते. धनाजी जाधव यांचा जन्म स. १६५० च्या सुमारास झाला. ते प्रथम प्रतापराव गुजराच्या हाताखाले होते. उंबराणीच्या लढाईत ते प्रथम पुढे आले. १६७४ मध्ये धनाजी हे हंबीरराव मोहिते याच्या हाताखाली गेले. विजापूरचा सेनापति अबदुलकरमि याच्याशी झालेल्या नेसरीच्या लढाईत त्यांनी विशेष शौर्य दाखविल्यामुळे धनाजी यांना बढती देण्यात आली. सावनूरच्या लढाईंत त्यांनी हुसेनखान याचा बिमोड केला तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज यांनी धनाजी यांचे कौतुक केले. संभाजी महाराज यांचा वध झाल्यावर आता पुढे काय करावे हे ठरविण्याकरिता जी मुख्य मुख्य मराठे मंडळी रायगडावर जमली त्यांत धनाजी जाधव होते, त्यांनी सातार्‍यास सर्जाखानाचा पराभव केला.
पुढे (१६९०) धनाजी हे राजाराम महाराजांसोबत जिंजीस गेले. तेथे त्यांनी इस्मायलमकाचा पराभव केला, यावेळी महादजी नाईक पानसंबळ यांचा मृत्यू झाल्यानंतर संताजी घोरपडे यांना सेनापति बनवण्यात आले.  त्यांच्या बरोबर धनाजी जाधव यांना जयसिंगराव ही पदवी देऊन महाराष्ट्रात पाठविण्यात आले. महाराष्ट्रात १६९२ साली संताजीच्या वाईकडील व गोदेच्या उत्तरतीरींच्या मोहिमांत बरोबर धनाजी होते. धनाजी यांच्या सैन्यांत संताजी यांच्या इतकी चांगली शिस्त नव्हती पण ते आपल्या लोकांना अधिक प्रिय होते. इकडे धनाजी यांनी अमात्य व सचिव यांच्याबरोबर पन्हाळा घेतला.

धनाजी हे संताजी घोरपडे यांच्याबरोबर महाराष्ट्रातून पुन्हा कर्नाटकांत आल्यावर (१६९३) पुढील वर्षें संताजी यांच्या बरोबर होते. परंतु शेवटी या दोन्ही सरदारांमध्ये वैमनस्य निर्माण झाले. धनाजी अर्ध्या लोकांसह (सुमारे १०००० फौज) झुल्फिकारखानाचा समाचार घेण्याकरिता पुन्हा कर्नाटकात आले. पुढे दोन वर्षें धनाजी आणि झुल्फिकारखान यांच्यात झटापट चालू होती. त्यावेळी व त्यानंतर धनाजी यांनी कर्नाटक व महाराष्‍ट्र सर्व बाजूस आपली फौज पसरून मोंगलाशी चाललेल्या युद्धांत बरेच पराक्रम केले (१७०३-०५) त्यामुळे औरंगझेब फार चिडला परंतु, त्याला मराठयांचा पुन्हा पराभव करणे शक्य झाले नाही.

औरंगझेब महाराष्ट्रातील किल्ले घेण्यात गुंतला होता. तेव्हा धनाजी यांनी आपली बायकामुले वाघिणगिरे येथे आणून ठेवली. इ. स. १७०५-०७ च्या सुमारास औरंगझेबाने तेथील गढीस वेढा दिला, तेव्हा धनाजी मोगलांच्या सैन्याभोवती घिरटया घालून त्यांना त्रास देत होता. धनाजी मोंगलांच्या शिपायांस इतका धाक बसला होता  की ते आलेले दृष्‍टीस पडताच पळावयास लागत. यानंतर मोगलांच्या छावणींतून शाहू महाराजांची सुटका करून धनाजी महाराष्ट्रात आले, पुढे धनाजी जाधव हे शाहू महाराज यांच्या सोबत राहिले. शाहू महाराज गादीवर बसले तेव्हा त्यांनी धनाजी जाधव यांनाच सेनापतीच्या जागी कायम ठेवले व त्यांच्याकडे जिल्ह्यांचा महसूल गोळा करण्याचे काम सोपवले. धनाजी हे अखेरपर्यंत कोल्हापूरच्या विरुद्ध शाहू महाराज यांच्या बरोबरच राहिले. कोल्हापूरकर मात्र त्यांना फोडण्याचा प्रयत्‍न करीत होते. पुढल्या वर्षीं धनाजी हे कोल्हापूरकरवरील रांगण्याच्या मोहिमेवरून परत येत असताना वारणा नदीच्या कांठी वडगांव येथे २७ जुलै १७०८ रोजी त्यांचे निधन झाले.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -