ठाकरे की पवार, संजय राऊत नेमके कुणाचे?

महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करताना शिवसेनेचे नेते संजय राऊत यांची शरद पवार यांच्यासोबतची जवळीक दिसून आली. त्यामुळे संजय राऊत हे नेमके कुणाचे? ठाकरेंचे की पवारांचे? असे प्रश्न उभे राहिले होते. या प्रश्नांना खुद्द खासदार संजय राऊत यांनीच आपल्या शैलीत उत्तर दिले.