बॉलिवूडचा किंग खान मुलासोबत पाहणार वर्ल्डकपचा सामना

शाहरुख खाने आपल्या मुलगा आर्यन सोबत केली टि्वटरवर पोस्ट

भारत आणि पाकिस्तानच्या सामन्याला सुरुवात झाली आहे. या दोन्ही देशातील नागारिकांमध्ये एक वेगळ्याच प्रकारचा उत्साह दिसून येत आहे. तसेच आज ‘फादर्स डे’ देखील आहे. यानिमित्ताने सोशल मीडियावर चाहते तुफान पोस्ट टाकत आहेत. वर्ल्डकपच्या निमित्ताने बॉलिवूडच्या किंग खानने आपला मुलगा आर्यन सोबत भारत आणि पाकिस्तानचा सामना पाहण्यासाठी सज्ज असल्याची पोस्ट टि्वटरवर शेअर केली आहे.

शाहरुख खाने आपल्या मुलगा आर्यन सोबत ही पोस्ट शेअर केली आहे. या टि्वटमधल्या फोटोमध्ये दोघांनी भारतीय संघाची निळा रंग असलेली जर्सी घातली आहे. आर्यनच्या जर्सीवर ‘सिंबा’ असं लिहिलं आहे आणि शाहरुख खानच्या जर्सीवर ‘मुफासा’ असं लिहिल आहे. तसेच शाहरुखने ‘फादर्स डेच्या उत्साहाबरोबर मॅच पाहण्यासाठी तयार आहे….गो इंडिया गो..’ असं टि्वट केल आहे.

या दोघांच्या जर्सीवर लिहिलेलं मुफासा आणि सिंबा हे प्रसिद्ध कार्टून आहे. ‘लायन किंग’ या चित्रपटातील ही पात्र आहेत.