घरUncategorizedठाणे रेल्वे स्थानकात प्रवाशांसाठी 'स्वयंचलित पॅथॉलॉजी लॅब'

ठाणे रेल्वे स्थानकात प्रवाशांसाठी ‘स्वयंचलित पॅथॉलॉजी लॅब’

Subscribe

प्रवाशांना अर्ध्या किमतीत उपचार मिळणार असून २४ तास कार्यरत असणार ही लॅब.

ठाणे स्थानकांतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी खुशबर आहे. ठाणे स्थानकात ऑटोमॅटिक पॅथॉलॉजी लॅबचं सोमवारी उद्घाटन करण्यात येणार आहे. ही लॅब २४ तास सुरू असणार आहे. या पॅथॉलॉजीमध्ये ५० टक्के कमी दरात तपासणी करुन घेता येणार आहे. ठाणे रेल्वे परिसरात लॅब उभारनारा हा भारतातील सर्व प्रथम उपक्रम ठरला आहे. ठाणे फलाटावर असलेल्या ‘वन रुपी क्लिनिक’मध्ये या लॅबची सुरुवात केली जाणार आहे. २४ तास कार्यरत असलेली ऑटोमॅटिक पॅथालॉजी लॅब उभारण्यात येत असल्याचा फायदा सर्वांनाच घेता येणार आहे. अपघातादरम्यान जखमी झालेल्या प्रवाशांनाही रुग्णसेवा या लॅबकडून देण्यात येणार आहे.

स्वयंचलित पॅथॉलॉजी लॅब
अन्य पॅथॉलॉजी लॅबमध्ये मानवी श्रमाचा वापार केला जातो. पण, वन रुपी क्लिनिकची ही लॅब संपूर्णपणे मानवरहित आहे. लहान-मोठ्या अशा सहा मशीन २४ तास रुग्णांची सेवा करतील. या मशीनची किंमत तब्बल १६ ते १७ लाख इतकी सांगितल्या जात आहे. वन रूपी स्वयंचलित लॅबमध्ये एकंदरीत ५०० पेक्षा जास्त वैद्यकीय चाचण्या करणं शक्य आहे. त्यामध्ये रक्त, लघवी, थुंकी सोबतच किडनी यकृत, कर्करोग आणि अन्य रोगांच्या चाचण्या “ऑटोमॅटिक” पद्धतीने होणार आहे. या लॅबचं वैशिष्ट्य म्हणजे सर्व चाचण्या या अन्य पॅथॉलॉजी लॅबच्या अर्ध्या किंमतीत केल्या जाणार आहेत. भारतीय रेल्वेच्या इतिहासात पहिल्यांदाच अशा प्रकारची लॅब उभारण्यात आलेली आहे. त्याचा फायदा सर्वसामान्य जनतेला होणार आहे. अर्ध्या किंमतीत या लॅबमध्ये तपासण्या करुन मिळणार आहे, असं वन रुपी क्लिनिकचे संचालक डॉ. राहुल घुले यांनी सांगितलं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -