अमरनाथ यात्रेची तारीख जाहीर

अमरनाथ यात्रा ही यावेळेस २३ जून पासून ३ ऑगस्ट पर्यंत चालणार आहे. या यात्रेच्या  तारीखेचा निर्णय श्री अमरनाथजी श्राइन बोर्डच्या बैठकीत घेण्यात आला.

aamrnath yatra date declerd

अमरनाथ यात्रा करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. अमरनाथ यात्रा आता लवकरच सुरू होणार असून यात्रेच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. अमरनाथ यात्रा ही यावेळेस २३ जून पासून ३ ऑगस्ट पर्यंत असणार आहे. या यात्रेच्या तारखेचा निर्णय ‘श्री अमरनाथजी श्राइन बोर्ड’च्या बैठकीत घेण्यात आला. जम्मू कश्मीरचे नायब राज्यपाल आणि श्री अमरनाथ बोर्डाचे अध्यक्ष गिरीश मुमरू यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. गेल्या वर्षी कलम ३७० हटवण्यात आल्यानंतर ही यात्रा स्थगित करण्यात आली होती.

या वेळेस अमरनाथ तीर्थयात्रा करणाऱ्यांसाठी दोन मार्ग निश्चित करण्यात आले आहेत. या यात्रेत ‘पहलगाम मार्ग’ आणि ‘बालटाल मार्ग’ हे दोन मार्ग निश्चित करण्यात आले आहेत. ही तिर्थयात्रा करणारे यात्रेकरू जर पहलगाम मार्गाने गेले तर त्यांना अमरनाथ गुंफा पर्यंत पोहचण्यासाठी पाच दिवसांचा कालावधी लागतो. तसेच बालटाल मार्गाने गेले असता यात्रेकरू एका दिवसात पाहचू शकणार आहेत. हा मार्ग तीर्थयात्रा करणाऱ्यांमध्ये जरी लोकप्रिय असला तरीही हा रस्ता अनेक अडचणींनी भरलेला असतो.

अमरनाथ यात्रा करत असताना यात्रेकरूंना अनेकदा विविध अडचणींना सामोरे जावे लागते. मागील वर्षी जम्मू कश्मीरमध्ये कलम ३७० हटविल्याने यात्रा अर्धवट टाकण्यात आली होती. त्यानंतर ही पहिलीच यात्रा आहे. ही यात्रा शांततेत पार पडावी यासाठी, यंदा या यात्रेच्या सुरक्षेत वाढ करण्यात येणार असल्याचे समजते आहे.