घरUncategorized'हिरोपंती २' पोस्टर प्रदर्शित पण चाहत्यांनी केला कॉपीचा आरोप

‘हिरोपंती २’ पोस्टर प्रदर्शित पण चाहत्यांनी केला कॉपीचा आरोप

Subscribe

टायगर श्रॉफचा आगामी चित्रपट हिरोपंती २ चे पोस्टर नुकतेच प्रदर्शित झाले आहे. मात्र चित्रपटाचा पोस्टर प्रदर्शित होताच नेटकऱ्यांनी जॉन ३ विक या चित्रपटाची कॉपी केल्याचा आरोप टायगरवर केला आहे

टायगर श्रॉफचा आगामी चित्रपट हिरोपंती २ चे पोस्टर नुकतेच प्रदर्शित झाले आहे. या पोस्टरमध्ये टायगर श्रॉफचा लूक एकदम हटके दिसत आहे. तसेच पोस्टर पाहता पुन्हा एकदा त्याची अ‍ॅक्शन स्टाईल पाहयला मिळणार आहे हे स्पष्ट झाले आहे. हिरोपंती हा टायगर श्रॉफचा पहिला चित्रपट होता आणि या चित्रपटाने त्याला जबरदस्त ओळखही दिली होती. टायगर श्रॉफच्या हिरोपंती २ या चित्रपटाची निर्मिती साजिद नाडियाडवाला करणार आहेत, तर दिग्दर्शन अहमद खान करणार आहेत. मात्र चित्रपटाचा पोस्टर प्रदर्शित होताच नेटकऱ्यांनी जॉन ३ विक या चित्रपटाची कॉपी केल्याचा आरोप टायगरवर केला आहे. हिरोपंती २ हा चित्रपट १६ जुलै २०२१ मध्ये प्रदर्शित होणार आहे.

- Advertisement -

टायगरचा कोटातला लूक अगदी सेम आहे. जॉन विक हा हॉलिवूडचा सूपरहिट चित्रपट ठरला आहे. जगभरात या चित्रपटाला पसंती मिळाली आहे. पण सोशल मीडियावर टायगर श्रॉफच्या हिरोपंती चित्रपटावरून गदारोळ माजला आहे.

‘बागी 3’ मार्चमध्ये होणार रिलीज

टायगर श्रॉफचा ‘बागी 3’ मार्चमध्ये रिलीज होणार आहे आणि त्यात टायगर श्रॉफचा अ‍ॅक्शन अवतारही दिसला आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत श्रद्धा कपूर आणि रितेश देशमुख मुख्य भूमिकेत आहेत.आता हिरोपंती २ हा चित्रपट चाहत्यांच्या कितपत पसंतीस उतरतो हे बघण्यासारखे आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -