घरUncategorizedव्होडाफोन-आयडियाचे दर ३ डिसेंबरपासून वाढणार

व्होडाफोन-आयडियाचे दर ३ डिसेंबरपासून वाढणार

Subscribe

देशातील प्रसिद्ध दूरसंचार सेवा प्रदान करणारी कंपनी व्होडाफोन-आयडियाने आज प्रीपेड सेवेकरता नवा प्लान आणि नव्या टॅरिफ दराची घोषणा केली आहे

दूरसंचार कंपनी व्होडाफोन-आयडिया या दोन कंपन्या ३ डिसेंबर २०१९ पासून मोबाईल सेवेचे दर वाढणार आहेत. यासंदर्भातील घोषणा कंपनीने रविवारी केली आहे. देशातील प्रसिद्ध दूरसंचार सेवा प्रदान करणारी कंपनी व्होडाफोन-आयडियाने आज प्रीपेड सेवेकरता नवा प्लान आणि नव्या टॅरिफ दराची घोषणा केली आहे. या नव्या प्लाननुसार देशभरात ३ डिसेंबरपासून नवे दर ग्राहकांसाठी लागू करण्यात येणार आहे, असे कंपनीने सांगितले.

यानुसार, कंपनीने ग्राहकांसाठी दोन दिवस, २८ दिवस, ८४ दिवस आणि ३६५ दिवस वैधता असणाऱ्या नव्या प्लानची घोषणा देखील केली आहे. ग्राहकांसाठी प्रीपेड प्लानमध्ये हाय स्पीड डाटा आणि कॉलिंगची सुविधा देण्यात येणार आहे.

- Advertisement -

असे असणार व्होडा-आयडियाचा अनलिमिटेड पॅक

व्होडाफोन-आयडियाने आपल्या ग्राहकांसाठी १४९ आणि २४९ रुपयांचा प्लान लाँच केला आहे. १४९ च्या प्लानमध्ये अनलिमिटेड कॉलिंग, २ जीबी डाटा, ३०० एसएमएस आणि २८ दिवसांची वैधता मिळणार आहे. तर २४९ रुपयांच्या प्लानमध्ये अनलिमिटेड कॉलिंग, १.५ जीबी डाटा प्रतिदिन, १०० एसएमएस आणि २८ दिवसांचा कालावधी असणार आहे. याशिवाय २९९ आणि ३९९ रुपयांचे प्लान ग्राहकांकरता ३ डिसेंबरपासून उपलब्ध करण्यात येणार आहे.

ग्राहकांना २९९ रूपयांच्या प्लानमध्ये अनलिमिटेड कॉल, २ जीबी डाटा प्रतिदिन, १०० एसएमएस आणि २८ दिवसांची वैधता मिळणार असून ३९९ च्या प्लानमध्ये अनलिमिटेड कॉल, ३ जीबी डाटा, १०० एसएमएस आणि २८ दिवसांचा कालावधी असणार आहे.

- Advertisement -

व्होडाफोन-आयडियाचा सर्वात स्वस्त प्लान

व्होडाफोन-आयडियाने आपल्या ग्राहकांसाठी १९ रुपयांचे सर्वात स्वस्त असणारा प्लान सादर केला आहे. या प्लानमध्ये अनलिमिटेड ऑन-नेट वॉयस कॉल, १०० एसएमएससह १५० एमबी डाटा सुविधा मिळणार आहे. तर या प्लानची सुविधा मिळणार असून दोन दिवसाचा कालावधी असेल.


मोबाईल इंटरनेट सेवा १ डिसेंबरपासून होणार महाग; ‘ही’ आहेत कारणं
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -