Saturday, June 3, 2023
27 C
Mumbai
घर Uncategorized महिला सुरक्षेसाठी प.रे. चे एक पाऊल

महिला सुरक्षेसाठी प.रे. चे एक पाऊल

Subscribe

मुंबईतील बहुतांशी लोक रेल्वेने प्रवास करतात. यात महिला प्रवाशांची संख्या देखील लक्षणीय आहे. महिलांचा प्रवास सुरक्षित व्हावा यासाठी रेल्वेने नेहमीच पाऊले उचलली आहेत. महिला आणि बालकांच्या अधिक सुरक्षेसाठी आता पश्चिम रेल्वेकडून एक पाऊल उचलण्यात आले आहे. तुम्हालाही रेल्वेला महिला आणि बालकांच्या सुरक्षेसाठी काही सूचना आणि अभिप्राय सुचवायचे असतील, तर ४ जून ते ८ जून तुम्हाला थेट रेल्वे अधिकाऱ्यांशी संवाद साधता येणार आहे.

महिला सुरक्षा वर्ष २०१८-१९

- Advertisement -

रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी २०१८-१९ हे वर्ष ‘महिला आणि बाल सुरक्षा’ वर्ष म्हणून जाहीर केले आहे. यासाठीच वेगवेळ्या सुरक्षा योजना राबविल्या जात आहेत. पश्चिम रेल्वेतर्फे सुरक्षेसंदर्भात प्रवाशांकडून सूचना आणि अभिप्राय मागवण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वेच्या प्रमुख स्थानकावर १ तास हा कार्यक्रम चालणार असून वरिष्ठ महिला अधिकारी स्थानकावर असलेल्या महिला प्रवाशांसोबत या संदर्भात संवाद साधणार आहेत.


कार्यक्रमाचे वेळापत्रक

तारीख             स्थानक                                 स्थळ                                           वेळ   

४ जून                 वांद्रे (लोकल)       स्टेशन व्यवस्थापकांचे कार्यालय (मेन लाईन)      सकाळी १० ते  ११ वाजेपर्यंत

- Advertisement -

५ जून               मुंबई सेंट्रल            स्टेशन व्यवस्थापकांचे कार्यालय (मेन लाईन)      सकाळी १० ते  ११ वाजेपर्यंत

६ जून                अंधेरी                 स्टेशन व्यवस्थापकांचे कार्यालय                   सकाळी १० ते  ११ वाजेपर्यंत

७ जून              बोरिवली              महिला प्रतीक्षा कक्ष फलाट क्रमांक १०              सकाळी १० ते  ११ वाजेपर्यंत

८ जून             विरार                   स्टेशन व्यवस्थापकांचे कार्यालय                   सकाळी १० ते  ११ वाजेपर्यंत

महिला डब्यांमध्ये बसवणार ‘टॉक-बॅक’ प्रणाली

रेल्वेतील आपात्कालीन परिस्थितीत तातडीने मदत मिळण्यासाठी टॉक-बॅक प्रणाली देखील सुरु करण्यात येणार आहे. या आधी महिलांच्या अधिक सुरक्षेसाठी रेल्वेच्या प्रत्येक महिला डब्यांमध्ये कॅमेरे बसवण्यात आले. पश्चिम रेल्वेने आतापर्यंत महिला डब्यात ५० कॅमेरे बसवले आहेत. हे कॅमेरे २४ तास नजर ठेवून असतात.

व्हॉटसअप आणि अॅपद्वारे सुरक्षा

महिलांच्या सुरक्षेसाठी पश्चिमरेल्वेने व्हॉटसअप नंबर सुरु केला. ९००४४९६९८ या क्रमांकावर महिला संपर्क साधून मदत मिळवू शकतात. तर आयवॉच या रेल्वे मोबाईल अॅपच्या माध्यमातूनही तुम्ही आरपीएफच्या कंट्रोल रुमकडून मदत मिळवू शकता.

- Advertisment -