‘मिका सिंग’च्या व्हिडिओला ‘शान’ने केले ट्रोल

प्रवासादरम्यान विमानाचा फस्टक्लास पूर्ण बुक केल्याचा व्हिडिओ मिकाने टाकल्यानंतर गायक शानने केले अशा प्रकारे ट्रोल.

shaan and mika
प्रातिनिधिक फोटो

बॉलिवूडचा गायक मिका सिंग नेहेमीच लाईम लाईटमध्ये रहाण्यासाठी काहीपण करत असतो. यामुळे अनेकदा तो चर्चेचा विषय बनला आहे. कधी बॉलिवूडमधील मॉडेल मिकाविरोधात तक्रार करतात तर कधी मारामारी केल्यामुळे मिका चर्चेत असतो. नेहेमीच काहीतरी वेगळे करण्याचा प्रयत्न केल्यामुळे लोक आपल्याला फॉलो करतील अशी समज असणाऱ्या मिकाने प्रवासादरम्यान चक्क विमानाचा पूर्ण फर्स्टक्लास बुक केला. याचा व्हिडिओ त्याने सोशल मीडियावर टाकला होता. याच व्हिडिओवर गायक शान याने बॉलिंग करतानाचा तसाच व्हिडिओ बनवून मिकाला ट्रोल केले आहे. या व्हिडिओमध्ये शानने मिकाची नक्कल केली आहे .

पॉप किंग मायकल जॅक्सन याने पूर्ण विमान बुक करण्याची कल्पना प्रवासादरम्यान केली होती. मायकलचा रेकॉर्ट मोडण्यासाठी मिकाने अमीरात एअरलाइन्समधील फर्स्टक्लास मिकाने बुक केला. याचा व्हिडिओ मिकाने इन्स्ट्राग्रामवर टाकला. या व्हिडिओत मिकाने म्हटलं आहे की,”एका वेळी मायकल जॅक्सने एकटा प्रवास करण्याची कल्पना बोलून दाखवली होती. आज मलाही एकटे प्रवास करण्यात इच्छा झाली आहे. मला गोंधळ नको म्हणून मी पूर्ण फर्स्टक्लास बुक केला आहे. मला कोणीही दिसायला नको म्हणून सर्व सीट मी बुक केल्या आहेत. सिंग इज ऑलवेज किंग.” सेल्फीस्टिकव्दारे व्हिडिओ काढून त्याने पूर्ण फर्स्टक्लास मधील सीट्स त्याने या व्हिडिओत दाखवल्या होत्या. यानंतर लोकांनी त्याला ट्रोल करायला सुरुवात केली. “भाई थोडा ओव्हर हो गया.”, “एक सिट के पैसे भी किसी गरीब को देता था तो फर्स्टक्लास की लाईफ जिता था.” किंवा “शो ऑफ” अशा कमेंट लोकांनी केल्या होत्या.

या नंतर गायक शान ने आपल्या कुटुंबीयांबरोबर बॉलिंग खेळण्यासाठी गेला असता त्यानेही सर्व ट्रॅक बुक केले. मिकाची नक्कल करत त्याने मिकाला फॉलो करत असल्याचे सांगितले. हा व्हिडिओ त्याने ट्विटर अकाऊंटवर टाकला आहे. या व्हिडिओत त्याने म्हटले आहे की,”मलापण मिखा सारखा एकांत हवा आहे. म्हणून मी पूर्ण बॉलिंग रॅपच बुक केला आहे. येथे फक्त मी आणि माझे कुटुंब आहे. मिका आता आम्हीपण तुम्हाला फ्लॉलो करायला लागलो.”