घरUncategorizedनाशिक महानगरपालिकेतही महिलाराज

नाशिक महानगरपालिकेतही महिलाराज

Subscribe

शहराचा कारभार हाकणार्‍या नाशिक महापालिकेत बहुतांश प्रमुख पदांवर महिला पदाधिकारी समर्थपणे आपली कामगिरी बजावत आहेत. यात महापौर, स्थायी समिती सभापती, शिक्षण मंडळ, महिला व बालकल्याण समिती सभापती, प्रभाग सभापती अशा महत्वाच्या पदांचा समावेश आहे.

रंजना भानसी यांच्या रुपाने प्रथमच शहराला आदिवासी समाजाच्या पहिल्या महापौर सध्या लाभल्या आहेत. या शिवाय महापालिकेची अर्थवाहिणी म्हणून ओळख असलेल्या स्थायी समितीच्या सभापतीपदवर राजकारणाचा वारसा असलेल्या हिमगौरी आहेर-आडके यांनी काम पाहिले. विरोधकांबरोबरच स्वपक्षीयांचा विरोध डावलून त्यांनी सक्षमपणे कामकाज केले. याशिवाय शिक्षण मंडळाच्या सभापतीपदी सरीता सोनवणे आणि उपसभापतीपदी प्रतीभा सोनवणे कामकाज बघत आहेत. महिला बालकल्याण समिती सभापतीपदी कावेरी घुगे तर शहर सुधार समिती सभापतीपदाची धुरा पूनम सोनवणे यांच्या खांद्यावर आहे. शहरातील सहा पैकी चार प्रभाग समितींवर महिलाराज आहे. यात पंचवटीत पूनम धनगर, पूर्वमध्ये सुमन भालेराव, पश्चिममध्ये अ‍ॅड. वैशाली भोसले, सिडकोमध्ये हर्षा बडगुजर या सभापतीपद भूषवित आहेत.

- Advertisement -

चार आमदार महिला

नाशिक जिल्ह्यातील १५ पैकी चार विधानसभा मतदारसंघात महिलाराज आहे. यात नाशिक मध्य मतदारसंघात प्रा. देवयानी फरांदे, पश्चिम मतदार संघात सीमा हिरे, बागलाण मतदार संघात दीपिका चव्हाण, इगतपुरी मतदार संघात निर्मला गावीत यांचा समावेश आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -