घरUncategorizedयुवराजचे वडील धोनीवर संतापले, म्हणाले...

युवराजचे वडील धोनीवर संतापले, म्हणाले…

Subscribe

युवराजच्या वडिलांनी धोनीवर अनेकदा टीका केली आहे.

भारतीय संघाचा तडाखेबाज खेळाडू युवराज सिंहने नुकतीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. युवराज सिंहच्या निवृत्तीला इतर कोण जबाबदार नसून, भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीच आहे, असे युवराज सिंहचे वडील योगराज म्हणाले. युवराजच्या वडिलांनी धोनीवर अनेकदा टीका केली आहे. विश्वचषकानंतर धोनीची पोलखोल करणार असेही ते म्हणाले.

युवराजने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्यानंतर याबद्दल त्याच्या चाहत्यांनी त्याचे मनापासून कौतुक केले. युवराजसारख्या खेळाडूला बीसीसीआयने शेवटचा सामना खेळण्याची परवानगी द्यायया पाहिजे होती, असे अनेकजणं सोशलमीडियाच्या माध्यमातून प्रतिकिया देत होते. यामुळे युवराजच्या वडिलांनी खंत व्यक्त केली आहे. युवराजच्या निवृत्तीला धोनी अप्रत्यक्षरित्या कारणीभूत असल्याची टीका योगराज यांनी केली आहे. एवढेच नव्हे तर, विश्वचषक झाल्यानंतर धोनीची पोलखोल करणार असल्याचेही ते म्हणाले. निवृत्तीनंतर रोहीत शर्माने केलेल्या ट्विटला प्रत्युत्तर देताना युवराज भावूक झाल्याचे समजले.”माझ्या मनातील वेदना तुलाच माहीत आहेत”,असे युवराज रोहीत म्हणाला होता. “भारतीय संघातील अनेक माजी खेळाडूला योग्य पद्धतीने निरोप देता आला नाही. गौतम गंभीर, विरेंद्र सेहवाग यांच्यासोबत जे घडले तेच आता युवराजसोबतही घडले आहे. व्ही.व्ही. एस लक्ष्मण यासारख्या महान खेळाडूलाही अशाच पद्धतीने निवृत्ती स्वीकारावी लागली होती. यासाठी केवळ एकमेव माणूस जबाबदार आहे.” असेही योगराज एका मुलाखातीत म्हणाले. विश्वचषकानंतर योगराज सिंह काय भुमिका घेणार? भारतातील संपूर्ण क्रिकेट चाहत्यांचे याकडे लक्ष वेधले गेले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -