Thursday, July 7, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ नाशकातील बदनाम व्हिडीओ गल्लीचा होणार कायापालट

नाशकातील बदनाम व्हिडीओ गल्लीचा होणार कायापालट

Related Story

- Advertisement -

भद्रकाली देवीच्या मंदिरामुळे नावारुपाला आलेला भद्रकाली परिसर कधीकाळी नाशिकची प्रमुख व्यापारी बाजारपेठ म्हणून ओळखला जाई. भाजीबाजार, टॅक्सी स्टॅन्ड, लोखंड बाजार, अंत्यविधीच्या साहित्यापासून ते सर्व सामान्यांच्या दैनंदिन गरजा भागवणार्‍या सर्व वस्तू मिळण्याचं एकमेव ठिकाण होतं, ते म्हणजे भद्रकाली परिसर. काळाच्या ओघात परिसराचं रुप बदललं. नाशिककरांना हवाहवासा असलेला हा परिसर आेंगळवाणा होत गेला. याच भागाच आंबट शौकीनांचे शोक पूर्ण करणार्‍या धंद्यांनीही जम बसवला. कोरोनाच्या महामारीनं पाय पसरले, तसतशी ही व्हिडीओ गल्ली सुनसान झाली. लॉकडाऊनमुळे हे व्हिडीओ हॉल जसे बंद झाले, तसे ते आजवर उघडलेच नाहीत. तब्बल ३५ वर्षांपासून कायम असलेल्या व्हिडीओ गल्लीची ओळखच आता पुसली जाण्याच्या मार्गावर आहे. पण ही बाब परिसरातील राहिवाशांसाठी दिलासादायक ठरतेय. परिसरातल्या काही व्यावसायिकांनी एकत्र येत नाशिक सेंट्रल मार्केट कमिटीची स्थापना केलीय. त्यात सर्वात आधी व्हिडीओ हॉल कायमचे बंद करण्याचा एकमुखी निर्णय घेण्यात आला.

- Advertisement -