घरव्हिडिओनाशिकच्या महापौरपदावर विराजमान होऊन सतीशनाना कुलकर्णी यांना २२ नोव्हेंबर २०२० ला एक...

नाशिकच्या महापौरपदावर विराजमान होऊन सतीशनाना कुलकर्णी यांना २२ नोव्हेंबर २०२० ला एक वर्ष पूर्ण होतंय

Related Story

- Advertisement -

कोरोनाकाळात नानांनी सांभाळलेलं शहर आणि एकूणच वर्षपूर्ती यानिमित्त ‘माय महानगर’चा हा खास रिपोर्ट..

शहराला कोरोनामुक्त करण्यासाठी ‘झिरो नाशिक’ अभियान यशस्वीपणे राबवणारे महापौर सतीश नाना कुलकर्णी यांचे कार्य संपूर्ण राज्यासाठी आदर्शवत ठरतंय. कोरोनाच्या संकटकाळात त्यांनी केलेले नियोजन आणि राबवलेल्या योजना लक्षवेधी ठरताहेत. त्याचीच परिणीती म्हणजे नाशिकमध्ये कोरोना आटोक्यात आला. आपल्या कामाचा फारसा गाजावाजा न करता कर्तव्य म्हणून सातत्याने काम करणारे नाना सध्या कोरोना पॉझिटिव्ह आहेत. परंतु अशाही परिस्थितीत त्यांनी हार न मानता रुग्णालयातून महापालिका प्रशासनाशी मोबाईलवर संपर्क साधणं सुरु ठेवलंय. त्यांच्या अनुभवाचा फायदा प्रशासनालाही होतोय. महापौरपदावर विराजमान होऊन सतीशनाना कुलकर्णी यांना २२ नोव्हेंबर २०२० ला एक वर्ष पूर्ण होतंय. या वर्षपूर्तीनिमित्त ‘माय महानगर’चा हा खास रिपोर्ट..

- Advertisement -